महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोण दिल्लीत रॉजर फेडररसोबत टेनिस खेळतानाचा जुना फोटो व्हायरल - रॉजर फेडररचे टेनिस कोर्टवरील जुने फोटो

Roger Federer Retirement Announcement: अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रॉजर फेडररचे टेनिस कोर्टवरील जुने फोटो व्हायरल होत आहेत.

दीपिका पादुकोण आणि रॉजर फेडरर
दीपिका पादुकोण आणि रॉजर फेडरर

By

Published : Sep 16, 2022, 3:54 PM IST

मुंबई- स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने निवृत्तीची घोषणा केली आहे. फेडररने गुरुवारी (15 सप्टेंबर) ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर करून निवृत्तीची घोषणा केली. टेनिसच्या तमाम कोर्टवर त्याची उणीव भासणार असून त्याच्या निवृत्तीच्या घोषणेने देशातील आणि जगातील प्रसिद्ध लोकांचे डोळेही ओले झाले आहेत. फेडररच्या या घोषणेदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि फेडररचे टेनिस कोर्टवरील जुने फोटो व्हायरल होत आहेत.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2014 मध्ये रॉजर फेडरर भारतात आला होता. त्यावेळी रॉजरने बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिकासोबत चॅरिटी मॅच खेळली होती. दीपिकाचे वडील आणि माजी टेनिसपटू प्रकाश पदुकोण यांनीही रॉजरची भारतात भेट घेतली होती. रॉजर आपल्या 8 वर्षा पूर्वीच्या भारत दौऱ्यामुळे खूप खूश होता आणि त्याने वारंवार भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली.

भारताची राजधानी दिल्लीत रॉजरचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, जे तो आजपर्यंत विसरलेला नाही. भारतात दौऱ्यावेळी फेडररने भारतीय जेवणासह गुलाब जामुन, कुल्फी आणि फिरनीचा आस्वाद घेतला होता.

याशिवाय फेडररने भारतात आल्यानंतर कबाब, तंदूरी कोबी, तंदूरी आलू, नान बुखारीही खाल्ले होते. त्यावेळी या एका शोमध्ये फेडररने दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत डान्सही केला होता.

अनुष्का शर्मा, विराट कोहली, लारा दत्त आणि क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह जगभरातील लोकांनी फेडररला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण करून दिली आहे.

हेही वाचा -पहिल्या आठवड्यात ३०० कोटी कमाईचा ब्रम्हास्त्र निर्मात्यांचा दावा, नेटिझन्सचा मात्र अविश्वास

ABOUT THE AUTHOR

...view details