मुंबई- 'पेरियेरुम पेरुमल' या पहिल्याच चित्रपटामुळे भारतातील तमाम प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतलेल्या दिग्दर्शिक मारी सेल्वाराजचा 'मामनन' हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाची सध्या नेटफ्लिक्सवर भरपूर चर्चा होत आहे. ओटीटीवर रिलीज झालेल्या या चित्रपटात फहद फासिल एका जबरदस्त भूमिके त दिसत आहे. चित्रपटाच्या यशाचे श्रेय काही प्रमाणात वाडीवेलू आणि फहाद फासिल यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीला दिले जाऊ शकते. मारी सेल्वाराज यांनी अलीकडेच प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांची 'मामनन' चित्रपटातील फहद फासिलच्या अभिनयाबद्दलची एक रंजक घटना शेअर केली आहे.
'मामनन' चित्रपटाची कथा शोषण होणाऱ्या समाजातून निवडून आलेल्या एका आमदाराच्या कथेभोवती फिरते. या आमदाराची भूमिका अभिनेता वाडीवेलू यांनी केली आहे. तो एका पुरोगामी विचाराच्या राकीय पक्षाशी संबंधित असूनही त्याला जातीवर आधारित भेदभावाचा सामना करावा लागतो. या चित्रपटात फहद फासिलने साकारलेल्या एक उच्च जातीच्या निर्दयी राजकारणम्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील सुंदर गाणी ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केली आहेत.
अलीकडील एका मुलाखतीत, मारी सेल्वाराजने चित्रपटातील फहाद फासिलची भूमिका पाहिल्यानंतर एआर रहमान काय म्हणाला, त्याविषयी सांगितले. या चित्रपटातील फहाद फासिलची भूमिका भयानक असल्याचे रहमानने सांगितले. फहादने साकारलेले रथनावेलू हे पात्र पाहून रहमान यांना धक्का बसला व त्यांना भीतीही वाटली. यापुढे अशा भूमिका त्याने केल्या तर प्रेक्षक त्याचा द्वेष करु लागतील, त्यामुळे त्याने खलनायकाच्या भूमिकांना ब्रेक द्यावा असा सल्ला रहमानने दिला. त्याने रोमँटिक किंवा कॉमेडी चित्रपटांचा शोध घेण्याचा सल्लाही रहमानने दिला. रहमानला वाटत होते की फहादचे भावपूर्ण डोळे अशा भूमिकांसाठी योग्य असतील.
वाडीवेलू आणि फहाद फैासिल यांच्याशिवाय मामनन या चित्रपटात अनेक तमिळ प्रतिभावंत कलाकारांचा समावेश आहे. यामध्ये उदयनिधी स्टॅलिन आणि कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहेत. सेल्व्हा आरके यांनी एडिटिंग केले असून चित्रपटाचे सुंदर छायांकन थेनी इसवार यांनी केले आहे.