महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चननी जेव्हा व्हाईस मेसेज दिला तेव्हा राजू श्रीवास्तवने उघडले डोळे पण...

अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांना स्टँड-अप कलाकाराच्या उपचारा दरम्यान मदत करण्यासाठी व्हॉईस नोट पाठवली होती. 41 दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर बुधवारी श्रीवास्तव यांचे निधन झाले. किशोरवयापासूनच ते बच्चन यांचे निस्सीम चाहते होते.

अमिताभ बच्चन आणि राजू श्रीवास्तव
अमिताभ बच्चन आणि राजू श्रीवास्तव

By

Published : Sep 23, 2022, 3:48 PM IST

मुंबई- मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी कॉमेडियन-अभिनेता राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्या विनोदासाठी राजूचे स्मरण केले. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे 41 दिवसांच्या रुग्णालयातील उपचारानंतर बुधवारी श्रीवास्तव यांचे निधन झाले, ते किशोरवयापासूनच बच्चन यांचे उत्कट चाहते होते. सिनेमाच्या आयकॉनशी त्याचे साम्य आणि त्याने केलेल्या मिमिक्रीमुळे त्याला पहिला मोठा ब्रेक मिळाला.

"आणखी एक सहकारी, मित्र आणि सर्जनशील कलाकार आपल्याला सोडून निघून गेला. अचानक झालेला आजार आणि काळाच्या आधी, त्याची सर्जनशीलता पूर्ण होण्याआधीच तो निघून गेला... त्याचे विनोदाचे टायमिंग आणि त्याचे उत्सफुर्त विनोद आपल्यासोबत राहतील. तो अनोखा, मन मोकळा, स्पष्टवक्ता आणि विनोदाने भरलेला होता. तो आता स्वर्गात देवासोबत हास्य करत असेल, " असे बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे.

58 वर्षीय श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी दिल्लीतील हॉटेलमध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्समध्ये नेण्यात आले होते. त्यांची अँजिओप्लास्टी झाली आणि तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर होते. पोस्टमध्ये, बच्चन यांनी शेअर केले की त्यांनी श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांना स्टँड-अप कलाकाराच्यावर उपचारात मदत करण्यासाठी व्हॉईस नोट पाठवली होती.

"प्रत्येक दिवशी सकाळी त्याच्या जवळच्या व्यक्तींकडून माहिती घेत होतो, त्यांनी मला सल्ला दिला की, या स्थितीतून त्याने उठावे यासाठी त्याला एक व्हाईस मेसेज मी पाठवावा. मी तसे केले, त्यांनी त्याच्या कानाजवळ तो व्हाईस मेसेज वाजवला. एका प्रसंगी त्याने आपले डोळे थोडे उघडले आणि मग पुन्हा झाकले.'', असे बच्चन यांनी म्हटलंय.

राजू श्रीवास्तव हे भारतातील स्टँड-अप कॉमेडी सर्किटमधील एक लोकप्रिय नाव राहिले आहे. जेव्हा बच्चन कुली या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाले होते तेव्हा राजू पहिल्यांदा मुंबईत आला होता. बच्चनसोबतचे त्याचे नाते वर्षानुवर्षे कायम राहिले आणि आजही श्रीवास्तव यांच्या घरी अमिताभचा फोटो आहे.

हेही वाचा -समंथाच्या शाकुंतलमची रिलीज तारीख ठरली, पाहा घोषणेचा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details