मुंबई- बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान नेहमी नव्या प्रतिभावान सहकाऱ्यांसोबत काम करण्यासाठी ओळखला जातो. तो नवोदितांसाठी प्रेरणास्थानही असतो. मात्र त्याचा संयम यू ट्यूबर भुवन बामने घालवला आहे. प्राइम व्हिडिओने शेअर केलेल्या एका मेजशीर क्लिपमध्ये भुवन बामने लिहिलेली पठाणच्या ओटीटी प्रमोशनची स्क्रिप्ट शाहरुख वाचताना दिसतो. त्याने लिहिलेली स्क्रिप्ट खूपच सुमार वाटते. मग त्याला दुसरे काही तरी करण्यास सांगतो. भुवन पुन्हा नवे डायलॉग शाहरुखला सांगतो. पुन्हा पुन्हा संधी देऊनही शाहरुखला समाधान वाटत नाही आणि तो भुवनवर वैतागतो आणि कॅमेरा रोल करण्यास सांगतो. गंमतीने बनवलेल्या या व्हिडिओ क्लिपमध्ये किंग खान आणि भुवन ओटीटी रिलीज तारखेच्या घोषणेच्या व्हिडिओसाठी लाइन क्रॅक करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
पठाण हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात काही एडिट केलेले पठाणमधील सीन्सही दाखवले जाणार आहेत. त्यामुळे पठाणच्या चाहत्यांसाठी ही एक वेगळी पर्वणी असेल. २२ मार्च रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रसारित होईल.