मुंबई - web series and movies trailers : बॉलिवूडपासून साऊथ इंडस्ट्रीपर्यंत मनोरंजक चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. रवीना टंडनची वेब सीरीज 'कर्मा कॉलिंग' ते ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या 'देवरा पार्ट 1' असे अनेक चित्रपटांचे ट्रेलर आणि टीझर या आठवड्यात रिलीज करण्यात आले. दरम्यान 'देवरा पार्ट 1' या चित्रपटाची अनेकजण आतुरतेनं वाट पाहात आहेत. या आठवड्यात कुठल्या वेब सीरीज आणि चित्रपटांचे ट्रेलर, टीझर, गाणी रिलीज झाले आहेत हे पाहूया.
- कर्मा कॉलिंग :या आठवड्याच्या सुरुवातीला 'कर्मा कॉलिंग' या वेब सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये रवीना टंडन राजमाता इंद्राणी कोठारीच्या भूमिकेत दिसली होती. ट्रेलरवरून हे स्पष्ट झाले आहे की ही या वेब सीरीजची कहाणी खूप मनोरंजक आणि ट्विस्टने भरलेली असणार आहे. ही वेब सीरीज 26 जानेवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होईल.
- देवरा भाग 1 :आआरआर फेम साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर स्टारर नवीन चित्रपट 'देवरा: पार्ट 1' चा ट्रेलर देखील याच आठवड्यात रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये एनटीआर अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. जान्हवी कपूरचा हा तेलुगू डेब्यू चित्रपट आहे, जो 5 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे.
- इंडियन पुलिस फोर्स सीजन 1 : रोहित शेट्टी दिग्दर्शित 'इंडियन पोलिस फोर्स ' वेबसीरीजचा सीझन 1 लवकरच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. या वेबसीरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय फुल अॅक्शन मोडमध्ये दिसेल. या आठवड्यात वेबसीरीजचाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ही वेब सीरीज 19 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
- तेरी बातों में ऐसा उलझा जिया : शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर नवीन रोमँटिक चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' आहे. चित्रपटाच्या नावाच्या घोषणेसोबतच टीझर आणि ट्रेलरच्या आधी या चित्रपटामधील 'लाल पीली अखियां' हे गाणे रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यातील शाहिद आणि क्रितीचा रोमँटिक स्टाइल आणि डान्स पाहण्यासारखा आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
- सनफ्लावर सीजन 2 : सुनील ग्रोव्हर हिट वेब सीरीज 'सनफ्लॉवर' सीझन 2' घेऊन परतत आहे. या वेब सीरीजमध्ये एक मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता प्रेक्षकांना लवकरच या वेब सीरीजची पुढील कहाणी झी5वर पाहायला मिळेल.