महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Shah Rukh Khan on Pathaan : पठाण शांततेत रिलीज करण्यासाठी काही जणांना करावे लागले फोन; शाहरुखचा गौप्यस्फोट - शाहरुख खान मन्नत अभिवादन

पठाणला मनापासून दाद दिल्याबद्दल अभिनेता शाहरुख खानने सर्वांचे आभार मानले आहेत. शाहरुख खानने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रेक्षकांचे आभार मानले. तसेच चित्रपट प्रदर्शित करण्यावेळी आलेल्या अडचणीदेखील शाहरुखने यावेळी सांगितल्या.

shah rukh khan
शाहरुख खान

By

Published : Jan 30, 2023, 6:41 PM IST

Updated : Jan 30, 2023, 6:58 PM IST

मुंबई - पठाण चित्रपटाला भरघोस पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही सर्व प्रेक्षक आणि प्रसारमाध्यमांचे अत्यंत आभारी आहोत, असे अभिनेता शाहरुख खान याने म्हटले आहे. अभिनेता शाहरुख खानने माध्यमांशी संवाद साधला. काही वेळा लोकांना फोन करून आम्हाला आमचा चित्रपट शांतपणे प्रदर्शित करू द्या असे सांगावे लागले. चित्रपट पाहणे आणि चित्रपट निर्मिती हा प्रेमाचा अनुभव आहे आणि ज्यांनी आम्हाला पठाण लोकांसाठी प्रदर्शित करण्यात मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो, असे अभिनेता शाहरुख खान म्हणाला.

मन्नतमधून चाहत्यांना अभिवादन : शाहरुख खानने रविवारी त्याच्या मन्नत घरावरून चाहत्यांना अभिवादन केले होते. त्यांने चित्रपटाच्या यशाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. पठाण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख खान रविवारी प्रथमच सर्वासमोर आला होता. यावेळी शाहरुख खान ब्लॅक आउटफिटमध्ये दिसून आला. यावेळी त्याने चाहत्यांचे आभार मानले.

.

भारतात १६१ कोटींची कमाई : सुपरस्टार शाहरुख खानचा पठाण चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटाचा डंका वाजत आहे. शाहरुख खानच्या 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. शाहरुख खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पठाणने शुक्रवारी ३८कोटी रुपयांची कमाई केली होती. याआधी या चित्रपटाने बुधवारी ५५ कोटी, गुरुवारी ६८ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात १६१कोटींची कमाई केली आहे. हा आकडा वाढत आहे.

पठाणची 3 दिवसांत 300 कोटींची कमाई : 'पठाण'ने तीन दिवसांत जगभरात 300 कोटींचा टप्पा ओलांडला आणि दुसरीकडे या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत 150 कोटींचा टप्पा ओलांडला आणि 162 कोटींची कमाई केली.

उर्फीने शाहरुखवरील प्रेम केले जाहीर - 'पठाण'च्या देशात आणि जगभरातील यशानंतर, उर्फी जावेदला जेव्हा शाहरुख खानबद्दल दोन गोष्टी सांगण्यास विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, 'मला शाहरुख खान खूप आवडतो, 'मला शाहरुखने त्याची दुसरी पत्नी बनवावे'. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा -Pathaan Box Office Collection Day 3 : 'पठाण'ची कमाई तिसऱ्या दिवशी घसरली, पहिल्या दोन दिवसांत तोडले अनेक रेकाॅर्ड

Last Updated : Jan 30, 2023, 6:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details