मुंबई- हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिच्या वाढदिवसानिमित्य एक मोठा संदेश लिहिला आहे. आपल्या लेकीच्या कर्तृत्वावर सिन्हा खूश आहेत. अलिकडेच प्रवाहित झालेल्या तिच्या दहाड या वेब सिरीजमधील सोनाक्षीच्या अभिनयावर ते खूपच समाधानी असून कौतुकाचा वर्षाव त्यांनी केलाय.
शत्रुघ्न सिन्हांनी केले लेकीचे कौतुक - शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर सोनाक्षीबद्दल लिहिले की, 'किती छान काळ काळ गेला. या खास दिवशी आमच्या या डोळ्यांना आनंदाचे, मनोरंजनाचे आणि उत्तुंग यशाचे वर्ष जावो. आम्हा सर्वांना तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे. तुझ्या सामार्थ्याने विशेषत: दहाडमधील तुझ्या अभिनयाने सर केलेले शिखर आज शहराच चर्चेचा विषय बनलाय. दहाड ही एक विलक्षण कथा आहे, त्यात तुझ्या पंखाना आणखीन बळ मिळालंय. तुझे नेहमीच एक खास स्थान असेल. तुझ्यासाठी आजचा महान दिवस आणि प्रत्येक दिवस आनंदाने आणि प्रेमाने भरलेला जावो. देव तुला आशीर्वाद देईल.'
वाढदिवसानिमित्य सोनाक्षीचे सेलेब्रिशन - खास प्रसंगी शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी आणि त्यांचे काही बालपणाचे आणि अलीकडील फोटो देखील शेअर केले. शत्रुघ्नच्या फोटोंमध्ये सोनाक्षीची आई पूनम सिन्हा आणि तिचे जुळे भाऊ लव आणि कुश सिन्हा यांचाही समावेश आहे. सोनाक्षीने अलीकडेच एका मीडिया पोर्टलला तिच्या या वर्षातील वाढदिवसाच्या प्लॅन्सबद्दल सांगितले होते की, 'गेल्या 5-6 वर्षांपासून, मी माझ्या वाढदिवशी प्रवास करत आहे... मला विश्रांती घेणे आणि काही जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवणे आवडते. मी अनेक वर्षांपासून हे करत आली आहे. मी सध्या शूटिंगच्या कामात गुंतली आहे, त्यामुळे मी फक्त माझ्या वाढदिवसासाठी जवळपास कुठेतरी प्रवास करू शकते. मी कदाचित अलिबाग किंवा लोणावळ्याला जाईन. पण मी अजून माझे मन बनवलेले नाही.'