महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Yash Drops New Look : केजीएफ स्टार यशचा भन्नाट काउबॉय लूक - यशचे भन्नाट लूक

केजीएफ स्टार यशने आता एक नवीन लूक बनविला आहे. या लूकमध्ये तो काउबॉयसारखा दिसत आहे. त्याचा हा लूक दाढी वाढवणाऱ्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी असल्याचे म्हटले जात आहे.

Yash
यश

By

Published : Jul 5, 2023, 5:03 PM IST

मुंबई :'रॉकी भाई' उर्फ ​​अभिनेता यशने आपल्या अभिनयाने देश आणि जगात आपले चाहते बनवले आहेत. तर दुसरीकडे, केजीएफ (KGF) स्टार यशच्या दाढीचे लूक हा चाहत्यांना आणि सेलेब्रिटींना देखील फार आवडते . यशच्या या लूकने चाहत्यांनी आणि सेलेब्रिटींना वेडे लावले होते. 'केजीएफ २' ('KGF 2') चित्रपटानंतर यश कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये दिसलेला नाही. विशेष म्हणजे यश केजीएफ फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या आगामी 'सालार' या चित्रपटात दिसणार आहे.

यशचे भन्नाट लूक :याआधी यशने त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा अस्वस्थ करण्याचे काम केले आहे. यश सध्या यश 19 (आगामी चित्रपट) मुळे चर्चेत आहे, मात्र आतापर्यंत या चित्रपटाचे कोणतेही अपडेट किंवा लुक समोर आलेला नाही. दरम्यान आता यशचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये यशचा लूक बनवला जात आहे. यात यश एका काउबॉयसारखा दिसत आहे. हा व्हिडिओ दाढी वाढवणाऱ्या उत्पादनाच्या जाहिरातीचा आहे, ज्यामध्ये यशचा दमदार लूक पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यशच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

'रॉकी भाई'मधून चाहत्यांनी केली ही मागणी : यशचा हा व्हिडिओ सध्याला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्ट यश 19 च्या घोषणेची मागणी करत आहेत, परंतु आतापर्यंत या चित्रपटाचे कोणतेही अपडेट चाहत्यांशी शेअर करण्यात आलेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार यशच्या आगामी चित्रपटाची शुटिंग जूनमध्ये सुरू झाले आहे. तसेच काही दृश्यांच्या शूटसाठी तो श्रीलंकेत परवानगी घेण्यासाठी गेला होता. यशने मल्याळम दिग्दर्शक गीतू मोहनदाससोबतही एक गँगस्टर साइन केल्याचे बोलले जात आहे, मात्र याबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. विशेष म्हणजे यशचे नाव नितेश तिवारीच्या रामायणाशी जोडले गेले होते, ज्यामध्ये रणबीर कपूर राम आणि आलिया भट्ट सीतेची भूमिका साकारणार आहे. दरम्यान यशला या चित्रपटात रावणाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, जी त्याने नाकारली आहे.

हेही वाचा :

  1. Aamir and Hirani to reunite : आमिर खान आणि राजकुमार हिराणी १० वर्षानंतर बायोपिकसाठी पुन्हा एकत्र, वाचा सविस्तर
  2. Satyaprem Ki Katha Box Office Collection :'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने सहव्या दिवशी केली 'इतके' रूपयांची कमाई...
  3. Shah Rukh Khan : शाहरुख खान अमेरिकेतून भारतात परतला ; मुंबई विमानतळावर झाला स्पॉट

ABOUT THE AUTHOR

...view details