महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'यश 19' चे शीर्षक ठरले, निर्मात्यांनी व्हिडिओ लॉन्च करुन दिली अपडेट - मोठ्या लोकांसाठी एक परीकथा

The title of Yash 19 was decided : केजीएफ स्टार यशच्या बहुप्रतिक्षित आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी चित्रपटाच्या शीर्षकाचे लॉन्चिंग केले. गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटाचं काम 'यश 19' असे शीर्षक देऊन सुरू होतं. आता या चित्रपटाचं नाव 'टॉक्सिक' असं ठरलं आहे.

The title of Yash 19 was decided
'यश 19' चे शीर्षक ठरले

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 3:26 PM IST

मुंबई - The title of Yash 19 was decided: 'केजीएफ' स्टार यशच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. या चित्रपटाचं वर्किंग टायटल 'यश 19' असं ठरवून चित्रपट निर्मितीला गती देण्यात आली होती. आता निर्मात्यांनी या चित्रपटाचे शीर्षक 'टॉक्सिक' असल्याचं उघड केलं आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शन करत असलेला 'टॉक्सिक' हा चित्रपट "मोठ्या लोकांसाठी एक परीकथा" असल्याचं म्हटलं जातंय. केव्हीएन प्रॉडक्शन निर्मिती करत असलेला या चित्रपटाला वेंकट के नारायणा यांनी बँकरोल केले आहे.

यशनं दिली आगामी चित्रपटाची अपडेट

'टॉक्सिक' चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करुन चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केली. स्वत: यशने त्याच्या इंस्टाग्रामवर हा घोषणा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यानं लिहिलंय, "'तुम्ही जे शोधत आहात ते तुम्हाला शोधत आहे' - रुमी. प्रौढांसाठी एक परीकथा, " असे म्हणत त्याने टॉक्सिक हा हॅशटॅग वापरलाय.

'केजीएफ चॅप्टर 2' हा बहुचर्चित चित्रपट 2022 मध्ये पूर्ण झाल्यानंतर यशच्या आगामी चित्रपटाचं शीर्षक ठरलंय. 'टॉक्सिक' असं नाव असलेल्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर यशच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वारं संचारलंय. चाहत्यांनी त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहिली आहे आणि त्यानं आता शीर्षक जाहीर करुन अपडेट दिली आहे.

यश बॉलिवूड पदार्पणासाठी उत्सुक

साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये मजबूत पाया निर्माण करुन यश यानं जाणीवपूर्वक बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. त्यानं नितेश तिवारी यांचा आगामी 'रामायण' हा बॉलिवूड चित्रपट साईन केलाय. खरतंर त्याच्या हातात 'केजीएफ 3' हा महत्त्वकांक्षी चित्रपट हातात असताना यश बॉलीवूडमधील संधी शोधण्यास उत्सुक आहे. 'रामायण'मधील त्याच्या भूमिकेसाठी यशने 100 कोटी रुपयांहून अधिक मागणी केल्याची कथित चर्चा रंगली होती. 'केजीएफ 3' हा चित्रपट 2025 मध्ये पडद्यावर येणार असून या वर्षाच्या अखेरीस प्रत्यक्ष शूटिंगला सुरूवात होईल.

हेही वाचा -

  1. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर'चा टीझर अखेर लॉन्च
  2. धर्मेंद्रना 'डार्लिंग पापा' म्हणत, ईशा देओलनं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  3. झोया अख्तरच्या डिनर पार्टीत सुहाना, अगस्त्य आणि खुशी कपूरसह 'द आर्चिज' गँगची हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details