मुंबई- विकी कौशल आणि सारा अली खान यांच्या 'जरा हटके जरा बचके'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त व्यवसाय केला. चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडमध्ये 15 कोटी रुपयांची कमाई केली आणि 50 कोटींचा टप्पा लीलया पार केला. एक मध्यम बजेट चित्रपट असूनही त्याने अनपेक्षितपणे चांगली कामगिरी केल्यामुळे टीमला खूप आनंद झाला आहे. विकी आणि सारा अली खान, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजन यांच्यासह कलाकार व तंत्रज्ञांनी एकत्र येऊन या यशाचे सेलेब्रिशन साजरे केले.
जरा हटके जरा बचके सक्सेस पार्टी - 'जरा हटके जरा बचके' सक्सेस पार्टीमध्ये विकी कौशल ट्रॅक पॅंट आणि हुडी घातलेला दिसत होता ज्यावर जरा हटके जरा बचके लिहिले होते. चित्रपटाच्या मर्चेंडाईजमध्ये, पांढरा टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या पँटमध्ये सारा अली खान खूप सुंदर दिसत होती. क्रिती सेनॉन देखील चित्रपटाच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी आली कारण तिचे दिनेश विजानसोबत खूप चांगले संबंध आहेत. जरा हटके जरा बचकेचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी कृती सेनॉनचा मिमी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने तिला अनेक पुरस्कार मिळवून दिले होते.
क्रिती सेनॉन, तमन्ना भाटियांनी वेधले लक्ष- जेव्हा क्रिती पार्टीत आली तेव्हा तिचे जोरदार स्वागत अभिनेता विक्की कौशलने केले. त्याने क्रितीला मिठी मारतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. चित्रपटाच्या यशात संगीताचा मोलाचा वाटा आहे. विक्कीचे वडील शाम कौशल हे देखील या पार्टीत स्पॉट झाले. पार्टीमध्ये तमन्ना भाटिया काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. ती तिच्या आगामी 'जी करदा' या चित्रपटाच्या टीमसोबत दिसली होती. या पार्टीत उपस्थित असलेल्या इतरांमध्ये श्रीराम राघवन आणि वरुण शर्मा यांचा समावेश होता. जरा हटके 2 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा घटस्फोटोपर्यंत पोहोचलेल्या एका प्रेमळ जोडप्याची आहे. दोघांनी कायदेशीर सरकारी योजनेद्वारे फ्लॅट मिळविण्यासाठी त्यांचा घटस्फोटाचा बनाव केलेला असतो.
विकी आणि साराची वर्कफ्रंट - विकी आणि सारा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 53 कोटींची कमाई केली आहे आणि तो यशस्वी ठरला आहे. विकी कौशल पुढे मेघना गुलजारच्या सॅम बहादूरमध्ये दिसणार आहे. तर, सारा अली खान होमी अदजानिया दिग्दर्शित मर्डर मुबारक आणि ए वतन मेरे वतनमध्ये दिसणार आहे. ती आदित्य रॉय कपूरसोबत मेट्रो इन दिनोमध्येही काम करत आहे. दिग्दर्शक अनुराग बासूसोबत तिचा हा पहिलाच चित्रपट असेल.