अबू धाबी: अबू धाबीमध्ये आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार आयफा 2023 हा सुरू झाला आहे. हा कार्यक्रम सुरू होण्यापुर्वी अभिनेता विकी कौशल हा त्याच्या चाहत्यासोबत सेल्फी काढत असताना अभिनेता सलमान खानची एन्ट्री झाली त्यानंतर विकी हा त्याला हँडशेक करण्यासाठी समोर आला मात्र तिथे त्याला सलमानच्या अंगरक्षकाने रोखले आणि त्याला बाजूला केले. त्यानंतर याप्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. व्हायरल व्हिडिओ हा गुरुवारी असणाऱ्या आयफा पत्रकार परिषदेचा आहे, ज्यात विकी, अभिषेक बच्चन, रकुल प्रीत सिंग, नोरा फतेही, राजकुमार राव, आणि सलमान उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ते लोक उशिरा पोहोचले होते.
आयफा रॉक्स : आयफा रॉक्स ग्रीन कार्पेटवर विक्कीला या घटनेबद्दल विचारण्यात आले, तर व्हायरल क्लिपवर प्रतिक्रिया देताना, विक्कीने सांगितले, 'कई बार बहुत बातें खराब हो जाती हैं' (काही गोष्टींबद्दल अनावश्यक बडबड होऊन जाते). गोष्टी व्हिडीओमध्ये जे दिसते तसे प्रत्यक्षात नसते. त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही.'खरं तर, विकी आणि सलमान हे ग्रीन कार्पेटवर एकमेकांना भेटले तेव्हा त्यांनी घट्ट मिठी मारली. या दोघांमध्ये ठीक नसल्याचा दावा करणाऱ्या बातम्यांचा इथेच शेवट झाला. विकी यावेळी अभिषेक बच्चनसोबत आयफा होस्ट करत आहे, तर सलमान हा आयफा मंचावर झळणार आहे.