महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

IIFA 2023 : शीला की जवानी गाण्यावर नाचताना विकी कौशलला राखी सांवतचा धक्का, व्हिडिओ व्हायरल - Vicky Kaushal almost trips over Rakhi Sawant

अभिनेता विकी कौशलने आयफा पुरस्कार सोहळ्यात राखी सावंत आणि सारा अली खान यांच्यासोबत शीला की जवानी गाण्यावर डान्स केला. या दरम्यान राखी सांवतचा धक्का विकीला लागल्यामुळे त्याचा तोल गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vicky Kaushal almost trips over Rakhi Sawant
विकी कौशलला राखी सांवतचा धक्का

By

Published : May 29, 2023, 1:21 PM IST

अबू धाबी - आयफा २०२३ पुरस्कार सोहळा धुमधडाक्यात पार पडला आहे. या बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय शोचे रोमांचक क्षण इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. सर्वात व्हायरल क्षणांपैकी एक अभिनेता विकी कौशलचा आहे, ज्याने शनिवारी अबू धाबीमध्ये अभिषेक बच्चनसोबत आयफाच्या 23 व्या सोहळ्याचे आयोजन केले होते. व्हायरल व्हिडिओत राखी सावंतने चुकून विकीला ढकलले आणि ती जवळजवळ ट्रॅप झाली आहे.

विकी कौशलला राखी सावंतचा धक्का - क्लिपची सुरुवात राखी, सारा अली खान आणि विकी कौशल चिकनी चमेली या गाण्याच्या संगीतावर नाचत होते. काही वेळातच विकी म्हणतो, चला शीला की जवानीवर नाचूयात. त्यानंतर राखी, सारा आणि विकी या गाण्यावर नाचण्यासाठी सुरू करतात. यात राखीची चुकून विकीला टक्कर बसते आणि त्यामुळे त्याचा तोल जातो. या तिघांचा हा उत्साह पाहून प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष केला.

आयफा पुरस्काराचा रंगारंग सोहळा - हा व्हिडिओ नेटिझन्सचे भरपूर मनोरंजन करत आहे. अनेकांनी ही व्हिडिओ आवडल्याचे म्हटलंय. बॉलिवूडचा प्रतिष्ठित आयफा पुरस्कार २०२३ चा सोहळा शुक्रवार आणि शनिवारी अबू धाबी येथे 26 मे रोजी आयोजित आयफा रॉक्स इव्हेंटसह आणि 27 मे रोजी मुख्य पुरस्कारासह रात्री आयोजित करण्यात आला होता.सलमान खान, नोरा फतेही, क्रिती सॅनन, जॅकलीन फर्नांडिस, वरुण धवन आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासह इतरांनी या एन्टरटेनिंग रात्री त्यांच्या पॉवरपॅक परफॉर्मन्सने स्टेजवर धमाल केली. हृतिक रोशन आणि आलिया भट्ट यांना सर्वोत्कृष्ट कालाकारांचा पुरस्कार मिळाला. अजय देवगणचा दृष्यम २ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.

सुपरस्टार कमल हासन यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान - दाक्षिणात्य सुपरस्टार आणि निर्माते कमल हासन यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हा त्यांना प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओव्हीशन मिळाले. गायक आणि संगीतकार ए.आर. रहमानने कमल हासन यांना हा पुरस्कार प्रदान केला.

हेही वाचा -Adipurush Ram Siya Ram Song : आदिपुरुषमधील बहुप्रतीक्षित राम सिया राम हे गाणे अखेर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details