मुंबई - SRK's Chandigarh fans : अभिनेता शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचं प्रमोशन किंग खान खूप जोरदार करताना सध्या दिसत आहे. हा चित्रपट 21 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज होईल. आता अनेकजण चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहत आहेत. 'डंकी' चित्रपटाचं आगाऊ बुकिंग जोरात सुरू आहे. पंजाबी पार्श्वभूमीवर आधारित 'डंकी' या चित्रपटाला चंदीगडमध्येही भरभरून प्रेम मिळत आहे. 'डंकी' चित्रपटासाठी जालंधरमध्ये फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकिटं बुक करण्यासाठी चंदीगडचे किंग खानचे चाहते ड्रमसह ट्रॅक्टरमधून दाखल होताना सध्या दिसत आहेत.
शाहरुख खान फॅन क्लबचे व्हिडिओ : शाहरुख खानच्या फॅन क्लबनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये किंग खानचे चाहते 'डंकी' चित्रपटासाठी खूप उत्सुक दिसत आहेत. अनेक चाहते पंजाबी वेशभूषेत ढोलच्या तालावर नाचताना दिसत आहेत. काही चाहते शाहरुख खानच्या आगामी चित्रपटासाठी देवाजवळ आणि गुरुद्वारामध्ये प्रार्थना करताना दिसत आहेत. याशिवाय सध्या काही ठिकाणी फर्स्ट डे फर्स्ट शोच्या तिकिटांसाठी तिकिट खिडकीवर गोंधळ घालताना चाहते दिसत आहेत. तसेच जालंधरमधील ढिल्लॉन प्लाझाबाहेर चाहते 'डंकी'च्या रिलीजपूर्वी सेलिब्रेशन करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.