महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरला चाहत्याने केले प्रपोज, पाहा पुढे काय घडले - Shraddha Kapoor gushes as fan

श्रद्धा कपूरचा एक चाहता विमानतळावर तिच्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन आला. त्याने पुष्पगुच्छा तिला देत असताना गुडघ्यावर टेकून भेट स्वीकारण्याची विनंती केली. यावेळी श्रद्ध चक्क लाजल्याचे दिसते. त्या चाहत्याचे तिने आभार मानले.

Shraddha Kapoor
श्रद्धा कपूर

By

Published : Aug 2, 2023, 4:41 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या साधेपणाने आणि निरागसतेने चाहत्यांच्या मनावर राज्य करत असते. अलीकडेच, श्रद्धा कपूर विमानतळावरील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिचा एक चाहता तिला लाल गुलाब देऊन प्रपोज करताना दिसत आहे. त्यानंतर श्रद्धाने त्या चाहत्याजवळीची फुले घेवून त्याच्यासोबत फोटो काढून त्याला फुले परत केली. श्रद्धाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तिचा चाहता पुष्पगुच्छ देण्यासाठी गुडघ्यावर बसला आणि तिला पुष्पगुच्छ दिले. या दरम्यान श्रद्धा ही लाजली आणि अप्रतिम भेटवस्तूबद्दल चाहत्यांचे आभार मानले. श्रद्धाच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांच्या कमेंट येत आहेत.

श्रद्धाचा विमातळावरील लूक : पापाराझीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओत श्रद्धाने पांढर्‍या फुल स्लीव्ह टी-शर्ट आणि पांढर्‍या रंगाचे स्कर्ट परिधान केले आहे. याशिवाय तिने पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स यावर घातले आहे. यासोबत तिच्या खांद्यावर एक बहु-रंगीत स्लिंग बॅग दिसत आहे. या लूकमध्ये श्रद्धा खूप खास दिसत आहे. दरम्यान अनेकदा श्रद्धाला तिचे चाहते विमातळावर भेटल्यानंतर ती खूप शांतपणे त्यांच्याशी बोलते, अलीकडेच एका चाहत्याने विमातळावर श्रद्धासोबत डान्स केला होता. श्रद्धाचा हा व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता.

व्हिडिओवर आल्या कमेंट :व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एका चाहत्याने कमेंट विभागात लिहले, 'लकी फॅन'.आणखी एकाने लिहिले, 'ती खूप नम्र आहे आणि सुंदर आहे'. दुसर्‍या चाहत्याने लिहिले, 'उफ ती खूप सुंदर आहे. तुझ्यावर खूप प्रेम आहे.' श्रद्धाचे इंस्टाग्रामवर ८१.८ दशलक्ष फॅन फॉलोअर्स आहेत. इंडस्ट्रीमध्ये १३ वर्षे पूर्ण केल्यानंतर, तिचा देशात एक मजबूत चाहता वर्ग आहे.

वर्कफ्रंट : श्रद्धाच्या कामाबद्दल सांगायचे तर, ती शेवटची रणबीर कपूरसोबत लव रंजन दिग्दर्शित 'तू झुठी मैं मकर'मध्ये दिसली होती. पुढे ती 'छिछोरे' आणि 'स्त्री'च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. राजकुमार रावसोबत पुन्हा 'स्त्री २'मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना ती दिसले. हा चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित मोदींनी स्वतःवर झालेल्या आरोपांचा केला खुलासा
  2. Oh My God 2 Trailer Postponed : नितीन देसाईच्या निधनामुळे 'ओह माय गॉड २'चा ट्रेलर लांबणीवर
  3. Nitin Desai Suicide Case : नितीन देसाईंच्या निधनाने कलाविश्वाला धक्का, आशुतोष गोवारीकरांसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

ABOUT THE AUTHOR

...view details