महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

JHJB Movie promotion : विक्की आणि सारा अलीचे लखनऊमध्ये 'जरा हटके जरा बचके'चे जोरदार प्रमोशन - जरा हटके जरा बचके प्रमोशन

विकी कौशल आणि सारा अली खान अहमदाबादमध्ये रात्री उशिरा झालेल्या आयपीएल फायनलमध्ये चैन्नई सुप्पर किंग सपोर्ट केला. त्यानंतर दोघे त्यांच्या आगामी चित्रपट 'जरा हटके जरा बचके'च्या प्रमोशनसाठी लखनऊला रवाना झाले.

विकी कौशल आणि सारा अली खान
विकी कौशल आणि सारा अली खान

By

Published : May 30, 2023, 4:00 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हे दोघे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या फायनलमध्ये चैन्नई सुप्पर किंग सपोर्ट करण्यासाठी सहभागी झाले होते. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला. त्यानंतर सारा आणि विक्कीने स्टँडवर जल्लोष केला. तसेच दोघेही मंगळवारी पहाटे लखनऊला 'जरा बचके जरा हटके'च्या प्रमोशनसाठी डुलकी न घेता येथून रवाना झाले. त्यानंतर विक्की कौशल आणि सारा अली खान मंगळवारी सकाळी लखनऊला पोहचले. विक्कीने यादिवशी सकाळी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ पोस्ट केला, त्यात कॅप्शन दिले, 'नींद हुई नहीं है गरीबी',आपसे मिलना है जरूरी...नवाबो का शहर हैं हम आ रहे, इस फ्रायडे मूव्ही जो हम ला रहे.' असे त्याने पोस्टद्वारे लिहले.

जरा हटके जरा बचके प्रमोशन : विक्कीच्या आगामी चित्रपट 'जरा हटके जरा बचके'मधील तेरे वास्ते हे गाणे कारमध्ये ऐकत असताना विक्कीने त्याच्या बाजूला झोपलेल्या सारासोबत एक व्हिडिओ काढला. लखनऊला जाताना साराने चांगली झोप येण्यासाठी डोळ्याचा मास्क लावला होता. विक्कीने आणि सारा या व्हिडिओत थकल्यासारखे दिसले होते. तर साराने या प्रवासा दरम्यान थोडी झोप घेतली असे या व्हिडिओत दिसत आहे.

आयपीएल फायनल :याआधी विकीने सोमवारी स्टेडियममधून विजेते आणि उपविजेत्या खेळाडूंना टाळ्या वाजवत एक व्हिडिओ पोस्ट केला. अभिनेत्याने व्हिडिओला कॅप्शन दिले, 'बदले तेरे माही... जर तुमच्या बदल्यात कोणी तुम्हाला जग देत असेल, तर ते जग कोणाला हवे आहे? माही बचावासाठी!!! जड्डू, तू रॉकस्टार आहेस!!! स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ. खरा विजेता. आयपीएल2023, आईपीएलफाइनल असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहले होते.

जरा हटके जरा बचके २ जून रोजी प्रदर्शित : साराने देखील इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. या व्हिडिओला कॅप्शन देत लिहले, ' वॉट ए मॅच!' ,अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत! रवींद्र जडेजा एक नाबाद दिग्गज आहे, आणि धोनीचा तिने विशेष उल्लेख केला. तसेच लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित जरा हटके जरा बचके हा चित्रपट २ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. लग्न करून एकत्र कुटुंबात स्थायिक झालेल्या दोन प्रेमी युगुलांभोवती फिरणारी कहाणी या चित्रपटाची असून या चित्रपटात सौम्या (सारा) कपिल (विक्की) हे दोघे काही वर्षांनी वेगळे होण्याची इच्छा करत असतात. या चित्रपटात आपल्या विक्की आणि साराचा अनोखा अंदाज बघायला मिळणार आहे.

हेही वाचा :Kareena Kapoor :विमानतळावर नो-मेकअप लूकमध्ये झक्कास दिसली करीना कपूर

ABOUT THE AUTHOR

...view details