महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर 'द आर्चीज' स्क्रिनिंगमध्ये एकत्र - द आर्चीज चित्रपट

Ananya Panday and Aditya Roy Kapur : 'द आर्चीज' चित्रपटाचा प्रीमियर शो काल संध्याकाळी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक सेलेब्रिटी उपस्थित होते. या प्रीमियरला कथित कपल अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर एकत्र दिसले.

Ananya Panday and Aditya Roy Kapur
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 11:08 AM IST

Updated : Dec 6, 2023, 12:18 PM IST

मुंबई - Ananya Panday and Aditya Roy Kapur : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा स्टारर 'द आर्चीज' रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. 'द आर्चीज' हा चित्रपट 7 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खाननं आपल्या मुलीच्या डेब्यू चित्रपटाच्या स्क्रिनिंगला आपल्या संपूर्ण कुटुंबासह हजेरी लावली. या प्रीमियरला अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. यावेळी बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरही स्क्रिनिंगला पोहोचलं.

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर एकत्र :'द आर्चीज'च्या स्क्रिनिंगमध्ये, अनन्या पांडेनं ऑफ-शोल्डर ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. यावेळी आदित्य रॉय कपूर नेव्ही ब्लू सूटमध्ये दिसला. यावेळी हे जोडपं एकत्र गप्पा मारताना दिसलं. या जोडीने पापाराझींला फोटोसाठी पोझ दिली. दरम्यान, या कार्यक्रमाच्या व्हायरल झालेल्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आदित्य रॉय कपूर अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिची बहीण इसाबेल कैफसोबत बोलताना दिसत आहे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अनन्यानं आदित्यबरोबर मालदीवमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला होता. याआधी हे कपल पहिल्यांदाच युरोप व्हॅकेशनवर एकत्र दिसले होते.

'द आर्चीज' चित्रपटाबद्दल :झोया अख्तर आणि रीमा कागती यांनी दिग्दर्शित केलेला 'द आर्चीज' 1960 च्या दशकातील कॉमिकवर आधारित आहे. यामध्ये सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा, रैना वेदांग, आहुजा मिहिर, अदिती डॉट आणि युवराज मेंडा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान या प्रीमियरला अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, श्वेता बच्चन, रणबीर कपूर, रणवीर सिंग हृतिक रोशन, सबा आझाद, जान्हवी कपूर, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, करण जोहर आणि मलायका अरोरा हे कलाकार उपस्थित होते याशिवाय बॉबी देओलही आपल्या पत्नीसह या कार्यक्रमाला हजर होता.

हेही वाचा :

  1. 'द आर्चीज' प्रीमियरमध्ये जया बच्चन पापाराझीवर भडकली, ट्रोलर्सना दिलं आमंत्रण
  2. सना रईस खाननं काम करण्यास दिला नकार दिल्यानं बिग बॉसमध्ये गृहकलह
  3. ममता बॅनर्जींनी केला सलमान खानसोबत डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्ही पण एकदा पाहाच
Last Updated : Dec 6, 2023, 12:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details