महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ranveer Singh : मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये रणवीर सिंगने पत्नी दीपिका पदुकोणचे घेतले चुंबन - आलिया भट्ट

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने काल रात्री मुंबईत एका भव्य ब्रायडल कॉउचर शोचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे शोस्टॉपर्स रणवीर सिंग आणि आलिया भट्ट होते. या कार्यक्रमादरम्यान रणवीरने पत्नी दीपिका पदुकोणचे चुंबन घेतले.

Ranveer Singh
रणवीर सिंग

By

Published : Jul 21, 2023, 3:15 PM IST

Updated : Jul 21, 2023, 3:24 PM IST

मुंबई : प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी काल रात्री मुंबईत एका भव्य ब्रायडल कॉउचर शोचे आयोजन केले होते, ज्यात 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट शोस्टॉपर्स म्हणून कार्यक्रमात होते. शोस्टॉपर्स असल्यामुळे रणवीर हा रॅम्पवर रॅम्पवॉक करत असताना मध्येच थांबला आणि समोर बसलेली पत्नी दीपिका पदुकोणला गालावर किस केले. याशिवाय त्याने (अंजू भवनानी) आईच्या पायाला स्पर्श केला आणि आशीर्वाद घेतला. तसेच त्याने समोर बसलेल्या करण जौहरलादेखील किस केली. मनीष मल्होत्राच्या या शोमध्ये अनेक स्टार्स आले होते. या शोमध्ये आलिया भट्ट आणि रणवीरने एकत्र रॅम्पवॉक केला. यावेळी सर्वांच्या नजरा या रणवीर आणि आलियावर टीकलेल्या होत्या. याव्यतिरिक्त रणवीरने अर्जुन कपूरनेला गालावर किस करून मीठी मारली. यावेळी दोघे खूप सुंदर दिसत होते.

रणवीरनी घेतली दीपिकाची किस :रणवीरचा फॅशन शोमधील व्हिडिओ हा आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रणवीरचे अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहे. व्हिडिओवर कमेंट करत एका चाहत्याने लिहले, 'जेव्हा तो तिला पाहतो तेव्हा तो ज्या पद्धतीने थांबतो, ते मला आवडले' तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहले, रणवीर हा दीपिकावर खूप प्रेम करतो. असा अनेकप्रकारच्या कमेंट या व्हिडिओवर येत आहे. रणवीरच्या या व्हिडिओ खूप लाईक केल्या जात आहे. काही चाहते या व्हिडिओवर हार्ट आणि स्माईल इमोजीचा वर्षाव करत आहेत.

रणवीर आणि दीपिकाचे लूक :या कार्यक्रमात रणवीरने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती, तर दीपिका ऑफ व्हाइट नेट साडीमध्ये होती. दरम्यान दीपिकाचा आगामी 'कल्कि २८९८ एडी'मधील तिचे सहकारी कलाकार सॅन डिएगो कॉमिक कॉनमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करत होते. दीपिका या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही कारण तिला एसएजी (SAG) मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रचारात्मक क्रियाकलापांमध्ये भाग घेण्यास मनाई केली आहे.

दीपिकाने घेतली मुकेश आणि इशा अंबानी भेट : दरम्यान दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दीपिका मुकेश अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानीची भेट घेत आहे. तसेच इव्हेंटमध्ये दीपिका तिच्या सासूची काळजी घेताना दिसत आहे. दीपिकाने तिचा रात्रीचा लूक शेअर केला आणि इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, 'कपड्याच्या खेळात साडी नेहमीच जिंकते.' कमेंट विभागात, रणवीर सिंगने प्रतिक्रिया देत म्हटले, 'जान लेले मेरी … दरम्यान 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर २८ जुलै रोजी रिलीज होणार आहे. गली बॉयच्या प्रचंड यशानंतर आलिया आणि रणवीर दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करणार आहेत.

हेही वाचा :

  1. Arjun Rampal : अर्जुन रामपाल ५० व्या वर्षी चौथ्यांदा झाला बाबा ; गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म...
  2. Prabhas : 'प्रोजेक्ट के'च्या खऱ्या नावाचा झाला खुलासा ; जाणून घ्या....
  3. Trial Period web series : जेनेलिया देशमुखच्या 'ट्रायल पीरियड' वेब सिरीजचे २१ जुलै पासून होणार प्रसारण
Last Updated : Jul 21, 2023, 3:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details