महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या या आगामी चित्रपटाचे व्हिडिओ फुटेज लीक... - Animal set gets leaked

अभिनेता रणबीर कपूर आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना पहिल्यांदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटापासून रणबीरला फार अपेक्षा आहे, कारण या चित्रपटात तो गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Ranbir Kapoor
रणबीर कपूर

By

Published : Jun 5, 2023, 2:36 PM IST

मुंबई :अभिनेतारणबीर कपूरचा पुढचा चित्रपट 'अ‍ॅनिमल'मध्ये त्याच्यासोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. रणबीरला त्याच्या आगामी चित्रपटापासून फार अपेक्षा आहे, कारण या चित्रपटात तो एका गुंडाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अनावरण केलेल्या पोस्टरमध्ये, रणबीर हा जखमी झालेला दिसत आहे. सध्याला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, रणबीरला त्याच्या तरुण व्यक्तिमत्त्वात क्लीन शेव्ह लूकमध्ये दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये रणबीर शाळेचा युनिफॉर्म घातलेला दिसत आहे. क्लीन शेव्हमध्ये रणबीर दिसला फार देखणा दिसत आहे. शिवाय त्याचा हा लूक चाहत्यांना फार पसंतीला पडला आहे. रणबीरचा हा फुटेज त्यांच्या सेटवरून लीक झाला आहे.

'रणबीर या व्हिडिओत फार गोंडस दिसत आहे, 'एका चाहत्याने या व्हिडिओसाठी लिहले, ' मी खरोखर या चित्रपटाची वाट पाहत आहे, तर दुसऱ्याने लिहिले, रणबीर फार खास आहे. लीक झालेल्या फुटेजवर प्रतिक्रिया देताना अनेक वापरकर्त्यांनी रेड हार्ट आणि फायर इमोजी टाकले आहे . चित्रपटातील रणबीरचा नवा लूक चाहत्यांना आवडल्याने या व्हिडिओवर चाहत्यांने कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्ट अ‍ॅनिमलबद्दल बोलताना रणबीरने एका मीडिया पोर्टलला सांगितले की, या चित्रपटाने त्याला अभिनेता म्हणून धक्का दिला आहे. 'माझ्यासाठी हा एक नवीन झोन आहे. ही एक क्राइम ड्रामा आणि पिता-पुत्राची कथा आहे. हे असे काहीतरी या चित्रपटात आहे की ज्याची अपेक्षा प्रेक्षक माझ्याकडून करणार नाहीत.

'मी हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी वाट पाहत आहे,' तो पुढे म्हणाला, 'मी चित्रपटासाठी फार अस्वस्थ आहे. अशा प्रकारचा अभिनय माझ्यासारख्या कलाकारांसाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण असा अभिनयाने मला हादरवून सोडले आहे. यामुळे मला यासाठी फार प्रयत्न करावे लागले आहे, आणि मला कळवले की मी किती अपुरा आहे तसेच मला यासाठी फार कष्ट करावे लागले आहे.' असे यावेळी रणबीर सांगितले. रणबीर कपूर शेवटी रोमँटिक चित्रपट तू झुठी मैं मक्कारमध्ये दिसला होता, ज्यात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर होती. लव रंजन दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. तसेच 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्ना ही रणबीर कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिकाकडे सध्या बॉलिवूडचे अनेक चित्रपट आहेत.

हेही वाचा :

  1. Sara ali khan watched movie : साराने कुटुंबासह पाहिला 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट
  2. Gufi Pental passed away : महाभारतातील शकुनी मामा फेम गुफी पेंटल यांचे ७८ व्या वर्षी निधन
  3. Sulochana Latkar : लता मंगेशकर ते बिग बीने समर्थन देऊनही सुलोचना दीदींची 'ती' इच्छा राहिली अपूर्ण

ABOUT THE AUTHOR

...view details