मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'अॅनिमल' या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'अॅनिमल' हा चित्रपट यापूर्वी ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत वाढ झाली आहे. रणबीरला या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. अलीकडेच, रणबीर कपूरची पत्नी आलिया भट्टचा २८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये तो दिसला होता. आता तो राजधानी दिल्लीत पोहोचला आहे. येथे तो 'ड्रीम गर्ल' फेम अभिनेत्री नुश्रत भरुचासोबत दिसत आहे. यावेळो दोघे विमातळाच्या बाहेर पडताना दिसले आहेत.
रणबीर-नुसरत दिल्लीत दिसले : दिल्लीमधील एअरपोर्ट लूकमध्ये रणबीर कपूर हा खूप स्टायलिश दिसत होता. रणबीर कपूरने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या डेनिमवर लांब कोट परिधान केला होता. यासोबत त्याने पांढरे स्नीकर्स घातले होते. लूकला आणखी खास बनविण्यासाठी रणबीरने डोळ्यांवर चष्मा आणि डोक्यावर लोकरीची टोपी घातली होती. तर नुश्रत यावेळी ब्लॅक लूकमध्ये दिसली. या व्हिडिओमध्ये दोन्ही स्टार्स जबरदस्त स्टाइलमध्ये पाहायला मिळाले.आता रणबीर आणि नुश्रतला एकत्र बघून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. आता चाहते या जोडीचे खूप कौतुक करत आहे. या जोडीबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून या दोघांना आता एकत्र चित्रपटामध्ये पाहायचे आहे.