महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ram Charan on Oscar carpet : ऑस्कर कार्पेटवर राम चरण म्हणतो, 'आमचे येणारे बाळ आमच्यासाठी लकी आहे' - Ram Charan on the Oscar carpet

राम चरण आणि उपासना कामिनेनी ऑस्कर 2023 मध्ये जोडीने सहभागी झाले होते. लवकरच आई बाबा होणार असलेल्या या जोडीने पारंपरिक भारतीय वेशभूषा केली होती. सतत मिळत असलेल्या मानसन्मानामुळे तो भारावून गेला होता.

ऑस्कर कार्पेटवर राम चरण
ऑस्कर कार्पेटवर राम चरण

By

Published : Mar 13, 2023, 11:35 AM IST

मुंबई - आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याकडून चित्रपटाची टीमला मोठ्या अपेक्षा होत्या. त्यानुसार गाण्याने ऑस्करवर आपली मोहोर उमटवत टीमचा आत्मविश्वास सार्थ ठरवला. हा पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेता राम चरणने जबरदस्त हजेरी लावला. लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये 95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात राम चरण पत्नी उपासना कामिनेनी सोबत हजर होता. आरआरआर टीमसोबत ऑस्कर शॅम्पेन कार्पेटवर चालताना हे जोडपे एकत्र छान दिसत होते.

राम चरण आणि उपासना यांना त्यांच्या पहिल्या मुलाची अपेक्षा आहे. ऑस्करच्या कार्पेटवर मीडियाशी संवाद साधताना राम चरण म्हणाला की, त्यांचे बाळ आधीच खूप नशीब घेऊन येत आहे. प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कार्पेटवर चालताना काळा बंधगळा मखमली पोशाख परिधान करून भारतीय संस्कृतीला श्रद्धांजली अर्पण करताना राम चरण नेहमीप्रमाणेच धमाल दिसत होता. उपासना पांढऱ्या रंगाच्या साडीत मोहक दिसत होती जी तिने स्टेटमेंट नेकपीससोबत जोडली होती.

राम चरण, ज्यांना भारतात प्रचंड फॅन फॉलोइंग आहे, त्यांनी सांगितले की ऑस्कर 2023 मध्ये एक फॅनबॉय क्षण आहे. अभिनेत्याने हे देखील कबूल केले की पुरस्कार उत्सवापूर्वी तो घाबरला होता आणि त्याची पत्नी देखील काळजीत होती. 95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात मीडियाशी बोलताना राम चरण म्हणाला, 'ती (उपासना) सहा महिन्यांची गर्भवती आहे; मला वाटते की गोल्डन ग्लोबपासून ते इथे उभे राहण्यापर्यंत बाळ आधीच आमच्यासाठी खूप नशीब घेऊन येत आहे... !'

जूनच्या आसपास उपासना आणि राम चरण त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. एक दशकाहून अधिक काळ विवाहित असलेल्या राम चरण आणि उपासना यांनी पालकत्व स्वीकारण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहिली आणि त्यांचे बाळ आधीच जागतिक स्तरावर ट्रॉटर बनले आहे. आता तर आरआरआरच्या नाटू नाटू गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकल्यामुळे राम चरण आणि उपासनाचे होणारे बाळ तो म्हणतो त्याप्रमाणे खूप नशिबावान आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले.

हेही वाचा -Oscars 2023: पारंपरकिक वेषातील आरआरआर त्रिकुटाने जिंकली उपस्थितांची मने

ABOUT THE AUTHOR

...view details