मुंबई- अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा बऱ्याच दिवसांपासून डेट करीत असल्याच्या चर्चा आपण ऐकत आलोय. दोघे अनेकवेळा एकत्र दिसलेत, मुंबईत आणि दिल्लीत त्यांच्या एकत्र दिसण्याचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले शिवाय दोघे आयपीएल सामना पाहण्यासाठी आले असता प्रेक्षकांनी परिणीतीला भाभी म्हणूनही बोलवलंय, इतकं होऊनही ते आपण नात्यात आहोत असे म्हणाले नव्हते. पण त्यांची कृती चाहते आणि फॉलोअर्स विसरू शकलेले नाहीत. पण सध्या परिणीतीचे मुंबईतील वांद्रे येथील घर सजवण्यात आलंय.
राघव परिणीतीच्या एगेजमेंटसाठी घर सज्ज- परिणीतीच्या घरातील लेटेस्ट फोटोंमध्ये, संपूर्ण बाल्कनी परिसरात सजावटीची रोषणाई दिसू लागली असून घरात सुरू असलेली लगीनघाई स्पष्ट दिसत आहे. १३ मे रोजी परिणीतीचा साखरपुडा होणार आहे. एका सूत्रानुसार, हे दोघे 13 मे रोजी दिल्लीत अंगठ्याची देवाणघेवाण करतील. सुमारे 150 जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एंगेजमेंटला निवडक लोक निमंत्रीत - या कार्यक्रमाला राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परिणीती किंवा राघव या दोघांनीही अधिकृतपणे त्यांच्या नात्याची घोषणा केलेली नसली तरी एका राजकीय नेत्याने याबद्दलचे स्पष्ट सूतोवाच आणि अभिनंदनही केले होते. आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी परिणीती आणि राघवच्या छायाचित्रांचा कोलाज शेअर केला होता. अरोरा यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या मिलनाला भरपूर प्रेम, आनंद आणि सहवास लाभो. माझ्या शुभेच्छा', असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.