मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबतच्या नात्यामुळे खूप चर्चेत असते. पलक आणि इब्राहिम दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच कबूली दिलेली नाही. अनेकदा पलक आणि इब्राहिम हे वेगवेगळ्या पार्टीत एकत्र दिसतात. पापाराझी इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे. इब्राहिम आणि पलक मुंबईत डिनर डेटवर स्पॉट झाले. यावेळी पलक ऑफ-शोल्डर मिनी ड्रेसमध्ये होती. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत होती.
पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान आले चर्चेत : या प्रसंगी पलक तिवारीने केसांची पोनीटेल बांधली होती. लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिने यावर उंच टाचाचे बुट घातले होते. यासोबत तिने निळ्या रंगाची पर्स देखील घेतली होती. पलकची नजर पापाराझीकडे जाताच तिने पोझ दिली. तसेच दुसरीकडे, इब्राहिमने पांढरा टी-शर्ट आणि राखडी रंगाचा डेनिम्स परिधान केला होता. या लूकमध्ये तो खूप देखणा दिसत होता. अलीकडेच पलक ही 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपट सलमान खानसोबत दिसली होती. या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.