मुंबई - Arbaaz khan and Sshura Khan : अभिनेता अरबाज खाननं डिसेंबर 2023 मध्ये मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केलं. अरबाज खान गेल्या काही आठवड्यांपासून त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. बहीण अर्पिता खान शर्माच्या घरी झालेल्या समारंभात या जोडप्यानं त्यांच्या कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थित निकाह केला. निकाहच्या काही दिवसांनंतर, हे जोडपे शहरात फिरताना आणि डिनर डेटला जाताना दिसले आहे. या जोडप्यानं डिनर डेटवरून येत असताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अरबाज आणि शुरानं नाईट आउटसाठी मॅचिंग पोशाख परिधान केला होता. व्हिडिओमध्ये हे कपल रेस्टॉरंटच्या बाहेर येताना दिसत आहे.
अरबाज आणि शूरा झाले ट्रोल : अरबाज पिवळ्या स्वेटशर्टसह पांढरे स्नीकर्स घातलेले आहे. दुसरीकडे पत्नी शूरा खाननं स्वेटशर्ट आणि काळे बूट परिधान केले होते. हे जोडपे हातात घेऊन रस्त्यावरून जाताना दिसले. हे जोडपे जेव्हा कारमध्ये बसले, तेव्हा पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना शूरा लाजत असल्याचं दिसते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून काहीजण अरबाज आणि शूराला ट्रोल करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या पोस्टवर एका युजरनं लिहिलं, ''वडील मुलीला घेऊन जात आहे.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''अरबाज खानची छोटी मुलगी आहे.'' आणखी एकानं लिहिलं, ''अरबाजनं छोट्या मुलीसोबत लग्न केलं.'' अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत.