महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Mohanlal  Bhangra  with Akshay : सुपरस्टार मोहनलालचा अक्षय कुमारसोबत भांगडा, पाहणाऱ्यांच्या डोळ्याची पारणे फिटली - Lalettan grooving to Jimikki Kammal is unmissable

अक्षय कुमारने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मल्याळम सुपरस्टार मोहनलाल भांगड्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. एका हाय-प्रोफाइल लग्नाच्या कार्यक्रमाच्या दुसर्‍या व्हिडिओमध्ये, मोहनलाल पुन्हा एकदा त्याच्या गाजलेल्या जिमीकी कमल गाण्याची आठवण करुन देत आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Feb 10, 2023, 5:34 PM IST

हैदराबाद- 8 फेब्रुवारी रोजी जैसलमेर विमानतळावर स्पॉट झालेला मल्याळम सुपरस्टार मोहनलाल एका लग्नात सहभागी होण्यासाठी राजस्थानमध्ये होता. करण जोहरसोबत ऑन-फ्लाइट फोटो शेअर केल्यानंतर, मोहनलाल जयपूरमधील त्याच्या व्हायरल व्हिडिओंसह इंटरनेटवर परत चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, अक्षय कुमारदेखील मोहनलाल सोबत कार्यक्रमात देखील उपस्थित होता, त्याने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तो आणि मोहनलाल भांगडा करताना दिसत आहेत.

इन्स्टाग्रामवर अक्षयने स्वतःची आणि मोहनलालची एक छोटी व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये, दोन सुपरस्टार भांगड्याच्या तालावर नाचताना दिसत आहेत तर इतर पाहुणे दोघांना आनंद देत आहेत. व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले की, 'मोहनलाल सर तुमच्यासोबतचा हा डान्स मला कायम लक्षात राहील. अगदी अविस्मरणीय क्षण'

सुपरस्टार मोहनलालचा अक्षय कुमारसोबत भांगडा

अक्षय आणि मोहनलाल बाजूला ठेवून कार्यक्रमाला करण जोहर, मल्याळम अभिनेता-निर्माता पृथ्वीराज सुकुमारन आणि बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान इतर सेलिब्रिटींनी उपस्थिती दाखवली होती. जयपूरमधील रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांनीही परफॉर्म केले.

इव्हेंटमधील गायिका रेश्मा राघवेंद्रने शेअर केलेल्या दुसर्‍या व्हिडिओमध्ये, मोहनलाल 2017 मल्याळम चार्टबस्टर जिमिकी कमल या गाण्यालर धमाल डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्याने लाल कुर्ता आणि मॅचिंग पायजमा घातला होता. यात तो दोन तरुण मुलींसोबत नाचत असताना, त्याचा परफॉर्मन्स पाहून उपस्थितांनी शिट्ट्या आणि टाळ्यांचा जल्लोष केला. कोणाच्या हाय-प्रोफाइल लग्नासाठी मल्याळम फिल्म इंडस्ट्री आणि बॉलीवूडमधील सेलिब्रिटी जयपूरला गेले होते हे अद्याप कळलेले नाही. पण, इव्हेंटमधून समोर आलेले व्हिडिओ चाहत्यांसाठी नक्कीच एक मेजवानी आहेत.

वर्क फ्रंटवर, मोहनलाल पुढे रजनीकांतच्या जेलरमध्ये दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित चित्रपटात अभिनेता अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. याशिवाय, तो सर्वात यशस्वी फ्रँचायझी दृष्यम 3 मध्ये जॉर्ज कुट्टीच्या भूमिकेत देखील परतणार आहे. दृश्यम'चे निर्देशक जीतू जोसेफ मोहनलाल यांच्यासोबत 'राम' द्वारे पुन्हा कमबॅक करीत आहेत. राम चित्रपटाची कथा आणि शाहरुख खानच्या 'पठाण'मधील कथेत साम्य असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. हाच वाद घेऊन शाहरुखचे चाहते आणि मोहनलालचे चाहते सोशल मीडियावर ऑनलाइनद्वारे एकमेकांना चांगलेच भिडले आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने अलीकडेच त्याच्या हँडलवर चित्रपटाचा एक स्निपेट पोस्ट केला आहे.

हेही वाचा -Abhishek Shivalika Wedding : दृश्यम 2 चा दिग्दर्शक अभिषेक पाठकचा शिवालिका ओबेरॉयसोबत विवाह

ABOUT THE AUTHOR

...view details