मुंबई - katrina kaif :अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 9 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. या जोडप्याचं लग्न राजस्थानमधील सवाई माधेपूर येथे झाले होते. दरम्यान या कपलनं यावर्षी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला.आपल्या पती आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवल्यानंतर, कतरिना मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. विमानतळावर कॅट ही स्टायलिश अंदाजात दिसली. आता तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती खूप खास दिसत आहे. व्हिडिओमध्ये कॅट ही कारमधून उतरताना दिसत आहे.
कतरिना कैफचा व्हिडिओ : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्टायलिश ब्लॅक जॉगर्स आणि मॅचिंग टी-शर्टमध्ये कॅट सुंदर दिसत आहे. यावर तिनं काळ्या आणि पांढर्या रंगाचा शूज आणि बेज ट्रेंच कोटसह सनग्लास घातला आहे. व्हिडिओत कॅट नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. याशिवाय तिनं यावर सुंदर पोनीटेल घातली आहे. तिचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत एकानं लिहिलं, ''कतरिना मॅम मी तुमचा खूप मोठा चाहता आहे, तुम्ही नेहमीच सुंदर दिसता''. या पोस्टवर दुसऱ्या एकानं लिहिलं, ''कॅटचा एअरपोर्ट लूक खूप खास आहे''. यानंतर आणखी एकानं लिहिलं, ''कतरिना जगातून सर्वात सुंदर अभिनेत्री आहे''. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.