महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

karan johar and kangana ranaut : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण सीझन 8'मध्ये कंगना राणौत झळकेल... - कंगना राणौत

Karan johar and kangana ranaut : चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा शो 'कॉफी विथ करण सीझन 8' हा लवकरच प्रसारित होणार आहे. दरम्यान आता यावेळी पुन्हा एकदा प्रेक्षकांना या शोमध्ये कंगना राणौत दिसणार आहे.

Karan johar and kangana ranaut
करण जोहर आणि कंगना राणौत

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 3:50 PM IST

मुंबई - karan johar and kangana ranaut :चित्रपट निर्माता आणि टीव्ही शोचा होस्ट करण जोहर छोट्या पडद्यावर परत आला आहे. करणनं गेल्या आठवड्यात टॉक शो 'कॉफी विथ करण'चा सीझन 8 लाँच केला. करण जोहरचे चाहते त्याच्या लोकप्रिय आणि वादग्रस्त शोची आतुरतेने वाट पाहत होते. 'कॉफी विथ करण'मध्ये आता पुन्हा एकदा कंगना राणौत येणार असल्याचं समजतंय. यापूर्वी कंगना या शोमध्ये आली होती. या शोदरम्यान तिनं करणला खूप सुनावलं होतं, त्यानंतर त्याच्या यावेळी तणाव निर्माण झाला होता. या दोघांमधून अजूनही विस्तव जात नाही. आता एक करणनं शोसंदर्भातली एक यादी शेअर केली आहे.

'कॉफी विथ करण'चा सीझन 8 : या यादीत अनेक कलाकारांचा समावेश आहेत. याशिवाय यादीत कंगना राणौत देखील असल्याची चर्चा आहे. करणनं कंगनाला त्याच्या ‘कॉफी विथ करण’च्या पाचव्या सीझनमध्ये आमंत्रित केलं होतं. यापूर्वी करणवर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला जात होता. दरम्यान आता करणचा 'कॉफी विथ करण' हा शो नव्या सीझनसह ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान आता कंगानाने यानिमित्तानं पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे करणवर निशाणा साधला आहे. करण जोहर आणि कंगनामध्ये 'छत्तीसचा आकडा' आहे, हे सर्वांनाच माहित आहे. कधी काळी कंगना आणि करण आधी एकमेकांशी खूप चांगले वागायचे.

'कॉफी विथ करण' शोमध्येकंगना राणौत पुन्हा एकदा दिसतील : कंगनाने जेव्हा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या शोमध्ये हजेरी लावली तेव्हापासून हा वाद सुरू झाला. दरम्यान, करणच्या शोमध्ये जाण्याची आठवण सांगताना कंगनानं लिहिलं, ‘पापा जो (करण जोहर) आज ओटीटीवर त्याच्या 'कॉफी विथ करण'च्या एपिसोड्सची जाहिरात करत आहे. पापा जोला शुभेच्छा, पण या एपिसोडचं काय, अरे माफ करा! सर्जिकल स्ट्राइक, घरात घुसून मारलं होतं ना. माझा एपिसोड हा सर्वात लोकप्रिय एपिसोड होता आणि त्यानंतर हा शो टीव्हीवर येण बंद झाला. सध्या कंगना तिच्या आगामी चित्रपट 'तेजस'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. Amazon and Flipkart Big Sale 2023 :ऑनलाईन शॉपिंगवर अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर साइटस् देणार 'इतकी' सूट ; महाऑफर सुरू...
  2. Akshay Kumar :ट्रोल झालेल्या अक्षय कुमारनं तोडला पान मसाला कंपनीचा करार
  3. Cricket World Cup: अनुष्का शर्मानं विराटला अर्पण केलं हृदय, तर आथिया शेट्टीनं केलं राहुलचं कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details