मुंबई- Jackie Shroff cleans Ram temple : आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अनुभवी बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफलाही पर्यावरणाविषयी प्रचंड आवड आहे. जमिनीचं सवर्धन करणे आणि झाडे लावण्याच्या मोहीमेत तो अग्रभागी असतो. अलीकडेच जॅकीने स्वच्छतेच्या उपक्रमात भाग घेतल्यानंतर लक्ष वेधून घेतले.
इंस्टाग्रामवर पापाराझीच्या उकाउंटवर शेअर केलेला व्हिडिओ मुंबईतील सर्वात जुन्या राम मंदिरातील पायऱ्यांच्या साफसफाईमध्ये जॅकी श्रॉफ सहभागी झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला आणि त्याच्या अस्सल आणि नम्र कृतीने प्रभावित झालेल्या नेटिझन्सकडून भरपूर प्रशंसा मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार 22 जानेवारी रोजी अयोध्या राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी या स्वच्छता मोहिमेचा संबंध आहे. भारतभरातील मंदिरे स्वच्छ करण्यात अनेक मंत्री आणि सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. जॅकी श्रॉफ यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या साफसफाईला हजेरी लावली होती.