महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोण-रणवीर सिंग युरोप दौऱ्यावरुन मुंबईला परतले, रणबीर कपूरही झाला स्पॉट - रणबीर कपूरही झाला स्पॉट

Deepika Padukone and Ranveer Singh :रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस युरोपमध्ये साजरा केला. सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर हे जोडपं शुक्रवारी सकाळी मुंबई विमानतळावर परतले. दरम्यान, अ‍ॅनिमल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैदराबादला गेलेला रणबीर कपूरही विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला.

Deepika Padukone and Ranveer Singh
दीपिका पदुकोण-रणवीर सिंग

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2023, 4:21 PM IST

मुंबई - Deepika Padukone and Ranveer Singh : बॉलिवूडमध्ये 'दीपवीर' म्हणून सुप्रसिद्द असलेल्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणनं अलिकडेच त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा केला. युरोपमधील ब्रुसेल्स येथे सहलीचा आनंद घेत त्यांनी लग्नाच्या वाढदिवसाचं सेलेब्रिशन केलं. आता हे जोडप युरोपच्या सहलीवरुन मुंबईला परतलंय. नेहमी प्रमाणं उत्साहात रणवीरनं विमानतळावर एन्ट्री केली व पत्नीसह तो घरी निघून गेला. दरम्यान, मुंबई विमानतळावर रणबीर कपूरही स्पॉट झाला. तो सध्या 'अ‍ॅनिमल' या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.

इंस्टाग्रामवर पापाराझी अकाऊंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दीपिका आणि रणवीर विमानतळावर हातात हात घालून चालताना दिसत आहेत. यावेळी रणवीर सिंगनं डेनिम जीन्ससह स्टायलिश हिरव्या कोटच्या खाली प्रिंटेड काळी हुडी घातली होती. त्यानं आपलं डोकं हुडीने झाकलं होतं आणि डार्क सनग्लासेसने आपला एअरपोर्ट लूक पूर्ण केला होता. दीपिकानंही मॅचिंग ट्रॅक पॅंटसह काळ्या हुडीची निवड केली होती, तिच्या पोशाखला लांब राखाडी ट्रेंच कोटसह लेयर केले होते. 14 नोव्हेंबर रोजी रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यात आला.

कामाच्या आघाडीवर दीपिका पदुकोण अभिनेता प्रभासच्या 'कल्की 2898 एडी' या साय-फाय अ‍ॅक्शन चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यानंतर ती सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित एरियल अ‍ॅक्शन थ्रिलर 'फायटर'मध्ये हृतिक रोशनसोबत दिसणार आहे. याशिवाय तिच्या लाइनअपमध्ये रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' हा चित्रपटही आहे. त्यानंतर ती दिग्दर्शक फरहान अख्तरच्या आगामी अ‍ॅक्शन-पॅक थ्रिलर 'डॉन 3' मध्ये पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रणवीर सिंग डॉनची भूमिका साकारणार आहे.

दरम्यान, संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैदराबादला गेलेला रणबीर कपूर, शुक्रवारी मुंबई विमानतळावर परतल्यानंतर पापाराझींच्या कॅमेऱ्यात क्लिक झाला. यावेळी त्यानं काळा सनग्लासेस आणि पांढऱ्या टोपीसह ऍक्सेसरीझिंग करताना त्याने प्रवासासाठी मॅचिंग पॅन्ट आणि डॅपर हाफ जॅकेटसह काळा टी-शर्ट घातला होता.

1 डिसेंबर रोजी रिलीज होणार्‍या संदीप वंगा दिग्दर्शित आणि रश्मिका मंदान्नाच्या मुख्य भूमिकेमुळे अ‍ॅनिमल चित्रपटाबाबत तेलुगू भाषिक राज्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय.

हेही वाचा -

  1. डेव्हिड बेकहॅमसोबतच्या फोटोवरुन खिल्ली उडवणाऱ्या हर्षवर्धन कपूरनं दिलं शांत उत्तर

2.रश्मिका मंदान्ना डीपफेक वादानंतर केंद्र सरकार गंभीर, सोशल मीडिया दिग्गजांना चर्चेसाठी आमंत्रण

3.कृष्णा श्रॉफसोबत आकर्षक फॅशनसह कॅमेऱ्यात कैद झाली दिशा पटानी

ABOUT THE AUTHOR

...view details