मुंबई : बॉलिवूडचे स्टार कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण काल रात्री चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरी दिसले. रणवीर आणि दीपिका 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे यश साजरे करण्यासाठी करणच्या घरी आले होते. दीपिका पदुकोण 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या स्क्रिनिंगला उपस्थित नव्हती. ती अमेरिकेतून शुक्रवारीच परतली आहे. करणच्या या पार्टीत दीपिका आणि रणवीर वेगवेगळे आले होते मात्र जात दोघे एकत्र गेले होते.
दीपिका आणि रणवीर झाले पार्टीत सामील : 'पार्टीमॅन' अशी ओळख असलेल्या निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला आपल्या मित्र-मैत्रिणींना पार्टीसाठी बोलावण्याचे भन्नाट निमित्त मिळाले. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चे सक्सेस! शुक्रवारी करणच्या घरी त्याचे यार-दोस्त पार्टी मूडमध्येच पोहोचले. दीपिका पदुकोण या पार्टीपूर्वी नुकतीच अमेरिकेहून परतली होती. दीपिका क्लिपमध्ये तिच्या कारमध्ये करणच्या घरी येताना दिसत आहे. तिने प्रिंटेड ग्रीन टॉप आणि डेनिम्स परिधान केला आहे. दीपिका एकटीच या पार्टीत पोहचली होती. त्यानंतर रणवीर त्याच्या कारमधून करणच्या घरी पोहोचला होता. यावेळी रणवीरने पांढरी टी-शर्ट, पँट आणि टोपी परिधान केली होती. याशिवाय त्याने फेस मास्क देखील लावला होता. रणवीरने त्याच्या स्टाइलने पापाराझींकडे पाहत फ्लाइंग किस करत डोळे मिचकावले. पार्टी संपल्यानंतर दीपिका आणि रणवीर एकत्र घरी जात असताना कारमध्ये हे कपल रोमँटिक अंदाजात दिसले. अमेरिकेतून परतल्यानंतर 'हब्बी' रणवीरच्या सान्निध्याच असल्याचा आनंद दीपिकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.