मुंबई - Bobby Deol Entry Song : अभिनेता बॉबी देओलचं 'अॅनिमल' चित्रपटातील 'जमाल कुडू' हे गाणे खूप चर्चेत आहे. या गाण्याच्या संपूर्ण व्हिडिओची मागणी अनेक चाहते करत होते. आता अखेर निर्मात्यांनी 'जमाल कुडू'चा व्हिडिओ रिलीज केला आहे. 'जमाल कुडू' हे मूळ इराणी गाण्याचं नवं व्हर्जन आहे. या गाण्याची कोरिओग्राफ करण्याची कल्पनाही खुद्द बॉबी देओलची होती. बॉबीच्या या धमाकेदार एन्ट्रीनं चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर हे गाणं खूप लोकप्रिय झालं आहे. या गाण्यावर अनेकजण सध्या रिल्स बनवून पोस्ट करत आहेत. बॉबीनं 'अॅनिमल' चित्रपटामध्ये दमदार अभिनय केला, याबद्दल त्याचे कौतुक केलं जात आहे.
'जमाल कुडू'म्हणजे काय? : 'जमाल कुडू' हे एक इराणी गाणं असून ज्याचा अर्थ असा आहे की, 'ओह काली-काली आंखों वाली सुंदरी, अपनी सुंदरता से मेरा दिल मत तोड़ो'. या इराणी गाण्याचा आधुनिक ट्रॅक बनवण्याचे श्रेय संगीतकार हर्षवर्धन रामेश्वर यांना जाते. व्हिडिओची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये या गाण्याबाबत उत्साह वाढला होता. दरम्यान, अनेक चाहते या गाण्याच्या कमेंट सेक्शनमध्ये बॉबी देओलवरील प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. एका चाहत्यानं या व्हिडिओच्या कमेंट विभागात लिहिलं, ''मी एकच रील बनवला आहे, कारण ते आमच्या लॉर्ड बॉबीच्या गाण्याचं आहे''. तर दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, 'खूप खास गाणं आहे.' आणखी एका चाहत्यानं लिहिल, ''बॉबी सरांचे एंट्री गाणं 'जमाल कुडू'चं मला व्यसन लागलं आहे''. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.