मुंबई - गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका बाळाचे स्वागत केल्यानंतर अभिनेत्री बिपाशा बसू तिच्या आईपणाचा आनंद घेत असल्याचे दिसते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांना तिच्या मुलीसोबत घालवलेल्या क्वालिटी टाईमचे फोटो शेअर करत असते. शुक्रवारी, तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला ज्यामध्ये ती काही क्वालिटी टाईम घालवताना आणि देवीशी गप्पा मारताना दिसत आहे, तर देवीचे लहान तळवे तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत आहेत. हा व्हिडिओ तिचा पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोवरने शूट केला आहे.
पोस्टसोबत तिने लिहिले, 'माझ्या देवीसोबतच्या अंतहिन गप्पा, पापा करण ग्रोव्हरने कॅप्चर केलेले अनमोल क्षण. या पोस्टवर आरती सिंह आणि शमिता शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरतीने लिहिले, 'अव्वा' तर शमिताने कमेंट सेक्शनमध्ये हृदयाच्या इमोजीसह प्रेमाचा वर्षाव केला.
अलीकडेच बिपाशाने देवी 4 महिन्यांची झाल्यावर तिचा एक सुंदर फोटो पोस्ट केला होता. बिपाशा आणि करणने त्यांच्या लग्नाच्या सहा वर्षांनंतर, गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले. इंस्टाग्रामवर बिपाशाने तिच्या मुलीच्या नावाची घोषणा करणारी एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये लिहिले होते, '12.11.2022. देवी बसू सिंग ग्रोव्हर. आपल्या प्रेमाचे आणि माच्या आशीर्वादाचे भौतिक प्रकटीकरण आता येथे आहे आणि ती दैवी आहे.'
गेल्या वर्षी 16 ऑगस्ट रोजी या जोडप्याने अधिकृतपणे घोषित केले की ते पहिल्या मुलाचे आई बाबा होणार आहेत. बिपाशा आणि करण यांची पहिली भेट 2015 मध्ये भूषण पटेलच्या 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हा चित्रपट त्यांचा पहिलाच ऑन-स्क्रीन एकत्र येण्याचा होता. त्यांनी सुमारे १ वर्षे एकमेकांच्या भेटी गाठी घेतल्या, डेटिंग केले व अखेर विवाहबंधनात अडकले. गेल्या सात वर्षापासून बिपासा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर अतिशय सुखाचा संसार करत आहेत. त्यांच्या आनंदी विश्वातील चित्रे ते नेहमी आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतात. दोघांच्या संसारवेलीवर खुललेल्या देवी नावाच्या सुंदर कळीचे स्वागत करताना आई बाबा इतकाच आनंद दोघांच्याही चाहत्यांना झाला होता. त्यांनी भरभरुन आशीर्वाद देवीचा दिले आहेत.
हेही वाचा -Aishwarya Rajini Theft : रजनीकांतच्या मुलीच्या घरी चोरी, प्रकरणात ट्विस्ट, जिच्या घरी चोरी तिचीच होणार आता चौकशी