महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Alia Bhatt : भविष्यात राहा कपूर काय बनणार? आलिया भट्टने दिले भन्नाट उत्तर... - आलिया भट्टने दिले भन्नाट उत्तर

आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आलियाला एक प्रश्न विचारण्यात आला आहे, ज्याचे उत्तर तिने खूप विशेष दिले आहे.

Alia Bhatt
आलिया भट्ट

By

Published : Jul 21, 2023, 3:07 PM IST

मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या आलिया ही तिच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंगची हिट जोडी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातून प्रेक्षकांना दिसणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला फक्त एक आठवडा उरला आहे. याआधी, काल रात्री प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या फॅशन शोनंतर आलिया, रणवीर आणि करण जोहरने त्यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आलियाला एक प्रश्न विचारण्यात आला की, राहा कपूर भविष्यात काय होणार त्यावर आलियाने काय म्हटले हे जाणून घेवूया....

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी भविष्यात काय होणार? :आलिया भट्टचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुंबईत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आलिया ही सुंदर साडी नेसून आली होती. यावेळी ती खूप खास दिसत होती. त्यानंतर आलिया ही चित्रपटाच्या प्रेमकथेबद्दल बोलत होती, तेव्हा तिला मुलगीविषयी प्रश्न विचारण्यात आला की, राहा कपूरला भविष्यात काय बनवायला आवडेल. यावर आलिया भट्ट सांगितले की, 'मी तिला घरी वेगवेगळ्या गोष्टी करताना पाहते आणि मी म्हणते की तू नक्कीच वैज्ञानिक बनशील,असे त्यावेळी तिने सांगितले.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' कधी प्रदर्शित होणार? : प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने स्वतः 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. करण जोहरने बऱ्याच दिवसांनी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यामुळे हा चित्रपट रूपेरी पडद्यावर खूप कमाई करेल असे दिसत आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट २८ जुलै रोजी देशभरातील आणि जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या एका आठवड्यात करण जोहर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे प्रमोशन देशातील १०० हून अधिक शहरांमध्ये करणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

  1. Arjun Rampal : अर्जुन रामपाल ५० व्या वर्षी चौथ्यांदा झाला बाबा ; गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म...
  2. Kamal Hasan in Project K : 'म्हणून मी हा चित्रपट स्वीकारला...' कमल हासनने सांगितले 'प्रोजेक्ट के' स्वीकारण्याचे कारण
  3. Trial Period web series : जेनेलिया देशमुखच्या 'ट्रायल पीरियड' वेब सिरीजचे २१ जुलै पासून होणार प्रसारण

ABOUT THE AUTHOR

...view details