महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल'च्या स्क्रिनिंगला रणबीरचा टी शर्ट घातलेल्या आलियाच्या उपस्थितीनं वेधलं सर्वांचं लक्ष - रणबीर कपूरचा चेहरा असलेला टी शर्ट

Alia Bhatt at Animal screening : 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा रिलीजपूर्वी शुक्रवारी मुंबईत शो आयोजित करण्यात आला होता. याला अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली. यामध्ये पती रणबीर कपूरचा चेहरा असलेला टी शर्ट घालून स्क्रिनिंगला हजर असलेल्या आलिया भट्टनं उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं.

T-shirt with Ranbir Kapoor's face
रणबीर कपूरचा चेहरा असलेला टी शर्ट

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 9:46 AM IST

Updated : Dec 1, 2023, 12:16 PM IST

मुंबई- Alia Bhatt at Animal screening : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी दवडत नाहीत. गुरुवारी 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये आलियानं पती रणबीरवरील प्रेमाचं पुन्हा एकदा प्रदर्शन केलं. 'अ‍ॅनिमल'या अ‍ॅक्शन-पॅक्ड थ्रिलरच्या निर्मात्यांनी जिओ प्लाझा येथे विशेष स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं.

रणबीर कपूर या स्क्रिनिंगसाठी पत्नी आलिया भट्ट, आई नीतू कपूर, सासू सोनी राजदान, सासरे महेश भट्ट आणि आलियाची बहीण शाहीन भट्ट यांच्यासोबत कार्यक्रमात पोहोचला. प्रीमियरच्या वेळी आलियाचा पोशाख चर्चेत होता. तिनं रणबीर साकारत असलेल्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील पात्राचा फोटो असलेला टी शर्ट घातला होता. आलियानं परिधान केलेल्या या शर्टचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बर्‍याच चर्चेनंतर रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेला रिव्हेंज ड्रामा अखेर 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे. अनिल कपूर आणि रणबीर कपूर यामध्ये बापलेकाची भूमिका साकारत आहेत. दोघांमधलं नातं विस्कळीत असूनही रणबीर आपल्या वडिलांना जगातील ‘सर्वोत्तम पिता’ म्हणत असतो.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' हा बहुप्रतीक्षित चित्रपट यावर्षी 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. तसं घडलं असतं तरी या चित्रपटाची टक्कर सनी देओलच्या 'गदर 2' आणि अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या 'ओएमजी 2' सोबत झाली असती. परंतु, चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला. आता हा चित्रपट 1 रोजी रिलीज होतोय. मात्र या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर सामना विकी कौशल मुख्य भूमिका साकारत असलेल्या 'सॅम बहादूर'शी होणार आहे.

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं अ‍ॅडव्हान्स बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. फिल्म विषयक व्यापार तज्ञांचा अंदाज आहे की आठवड्याच्या शेवटी भारतातच 50 कोटी रुपयांची कमाई हा चित्रपट करेल. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा रनटाइम 3 तास 21 मिनिटांचा आहे.

हेही वाचा -

1. उर्वशी रौतेलाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

2.शाहरुख खान स्टारर 'डंकी' चित्रपटाच्या ट्रेलरबाबत 'ही' अपडेट आली समोर

3.'अ‍ॅनिमल'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जबरदस्त वेग; रणबीर कपूरच्या चित्रपटानं रिलीजपूर्वी केली 20 कोटीची कमाई

Last Updated : Dec 1, 2023, 12:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details