महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Cannes 2023: ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चनसह कान्स फिल्म फेस्टिव्हलला रवाना - Cannes 2023

ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चनसह कान्स फिल्म फेस्टिव्हलला निघताना विमानतळावर चाहत्यांनी खूप गर्दी केली होती. तिचे अनेक चाहते तिच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असतांना आराध्याला बाजूला ढकलत होते.

Aishwarya Rai
ऐश्वर्या राय

By

Published : May 17, 2023, 2:53 PM IST

मुंबई - फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये 76व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. हा महोत्सव १६ मे ते २७ मे या कालावधीमध्ये होत आहे. या कार्यक्रमात जगभरातील सेलेब्स येत आहेत. या वर्षी अनेक बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी कान्समध्ये पदार्पण केले आहे. दरम्यान,आता ऐश्वर्या राय बच्चनही मुलगी आराध्यासह कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी रवाना झाली आहे. बुधवारी सकाळी दोघींनाही विमानतळावर स्पॉट करण्यात आले. तसेच विमानतळावर ऐश्वर्याचे अनेक फोटो घेण्यात आले. त्यानंतर तिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले.

कान्स फिल्म फेस्टिव्हल ऐश्वर्या रवाना : बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी पहिल्याच दिवशी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले आहे. बुधवारी पहाटे ऐश्वर्या राय, मृणाल ठाकूर आणि अनुराग कश्यपदेखील कान्सला गेले आहेत. तसेच यावेळी ऐश्वर्यासोबत फोटो काढू इच्छिणाऱ्या असंख्य चाहत्यांनी विमानतळावर फार गर्दी केली होती. काही चाहत्यांनी आराध्याला मागे टाकले होते आणि ऐश्वर्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तिला बाजूला ढकलत होते. ऐश्वर्याने तिचे संरक्षण केले. तिने तिच्या चाहत्यांना मुलीसाठी रस्ता मोकळा करण्याची विनंत केली त्यानंतर ती शांतपणे विमानतळाच्या आत निघून गेली.

विमानतळावर चाहत्यांनी ढकलले आराध्याला : पापाराझीने त्याच्या अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या सुरुवातीला त्यांच्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहेत. या व्हिडिओत आराध्याला बाजूला ढकलण्यात आले आहे आणि काही लोक तिच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. ऐश्वर्याने चाहत्यांना बाजूला होण्यास आणि मुलगी आराध्यासाठी जागा तयार करण्यास सांगितले. असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने कमेंट केली आहे की, 'मी पाहिलेल्या सर्वात संरक्षणात्मक महिला.' दुसर्‍याने लिहिले, 'ओजी कान्स क्वीन.' अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर करण्यात आल्या आहे. गेल्या काही वर्षांपासून ऐश्वर्या ही तिच्या मुलीसह कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जात आहे.

हेही वाचा :Nushrat Bharuch Birthday : अभिनयाच्या क्षमतेवर यशाचे शीखर गाठणारी अभिनेत्री नुश्रत भरुच्चा

ABOUT THE AUTHOR

...view details