मुंबई - Agastya Nandas birthday with Suhana : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा बुधवारी आपला वाढदिवस साजरा करतोय. 'द आर्चीज' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेला अगस्त्यच्या बर्थ डे सेलेब्रिशनचा एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये तो केक कापताना दिसत असून यावेळी त्याच्यासोबत सहकलाकार आणि शाहरुख खानची मुलगी आणि कथित गर्लफ्रेंड सुहाना खानही दिसतेय.
'द आर्चीज'मधील त्याचे सहकलाकार, सुहाना खान आणि मिहिर आहुजा यांच्यासोबत अगस्त्य नंदा यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मिहिर आहुजाने इंस्टाग्रामवर त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केला होता. मिहीरने त्याच्या इंस्टाग्रामवर अगस्त्यसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. सुहाना खान आणि इतरांसोबत अगस्त्यच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक दाखवणारा व्हिडिओही त्याने पोस्ट केलाय.
व्हिडिओमध्ये अगस्त्य नंदा त्याच्या वाढदिवसाचा केक कापताना दिसतोय. तर सुहाना त्याच्यासाठी टाळ्या वाजवताना दिसतेय. बाकीचे व्हिडिओत दिसत नसले तरी वाढदिवसाचे गाणे गाताना अनेकांचे आवाज ऐकू येतात. अगस्त्याने काळ्या रंगाची टी आणि डेनिम जीन्स परिधान केलीय, तर सुहाना त्याच्या पोशाखाशी मॅचिंग करताना दिसतेय. अगस्त्यचा वाढदिवस साजरा करण्यात ती सहभागी झाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसतोय.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील फोटो आणि व्हिडिओसोबत मिहीरने कॅप्शनमध्ये त्याच्यावर असलेलं प्रेम आणि आस्था व्यक्त केलीय. आम्ही तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो, असंही लिहिलंय आणि त्याला त्याच्या 'द आर्चिस'साठी भरपूर सदिच्छाही दिल्यात.