मुंबई- बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानने मुलगी इरा खानच्या एंगेजमेंट सोहळ्यात पाहुण्यांसोबत भरपूर मजा मस्ती केली. इराने सप्टेंबरमध्ये जाहीर केले होते की ती लवकरच सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरशी लग्न करणार आहे. हे जोडपे दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. अखेर त्यांचा एंगेजमेंट सोहळा उत्साहात पार पडला. या इंटिमेट पार्टीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहे ज्यामध्ये आमिर खान कयामत से कयामत तक मधील त्याच्या हिट पापा कहते हैं या गाण्यावर नाचताना दिसत आहे.
शुक्रवारी इराने तिची दीर्घकाळची बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत एंगेजमेंट केली. इम्रान खान, आमिरच्या माजी पत्नी रीना दत्ता, किरण राव यांच्यापासून ते अभिनेत्री फातिमा सना शेखपर्यंत, एंगेजमेंट सोहळ्यात खान कुटुंबीय आनंदाने फुलले होते.