महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Vijay Sethupathi's first look: 'किंग खान'ची होणार 'डिलर ऑफ डेथ'शी टक्कर, 'जवान'मधील विजय सेतुपतीचे पोस्टर रिलीज - विजय सेतुपती जवना फर्सट लूक

शाहरुख खानने 'जवान' या आगामी चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले. यात तो विजय सेतुपती खरारी भूमिकेत दिसत आहे. विजय सेतुपती 'जवान'मध्ये खतरनाक खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jul 24, 2023, 4:07 PM IST

मुंबई - शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचे प्रमोशन खूप नियोजनपूर्वक सुरू आहे. या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटातील खलनायकाची ओळख त्याने करुन दिली आहे. यात विजय सेतुपती 'डिलर ऑफ डेथ'ची भूमिका साकारणार आहे. शाहरुखने विजयचे नवे पोस्टर रिलीज केले आहे. यात हा करिश्माई कलाकार झळकला आहे.

'जवान' चित्रपटाते विजय सेतुपती दहशत निर्माण करणाऱ्या खतरनाक खलनायकाच्या अवतारात दिसणार आहे. विजय आणि शाहरुख यांच्यात मोठ्या पडद्यावर होणारी टक्कर लोकांना खुर्चीवर खिळवून ठेवणारी असेल. 'याला कोणीच रोखू शकणार नाही', असे शाहरुखने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 'जवान' चित्रपटात विजय सेतुपतीची कास्टिंगमध्ये झालेली एन्ट्री चित्रपट प्रेमींची उत्कंठा वाढवणारी आहे. विजयच्या सिनेमातील उपस्थितीमुळे हमखास मनोरंजनाची खात्री चाहत्यांसह प्रेक्षकांना वाटत आहे. तो आपल्या चपळतेने आणि अभिनय क्षमतेचे कमालीचे प्रदर्शन करतो, हे सर्वांनाच माहिती आहे.

काही दिवसापूर्वी 'जवान' चित्रपटातील शाहरुख खान आणि नयनताराचे पोस्टर रिलीज झाले होते. त्यानंतर विजय सेतुपतीचे पोस्टर येईल, असा अंदाज प्रेक्षकांनी केला होता. 'जवान'चे पहिले पोस्टर रिलीज झाल्यापासून चित्रपटाबद्दलचे औत्सुक निर्माण झाले आणि वाढतच गेले. अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित 'जवान' या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपतीच्या प्रमुख भूमिका आहेत. यात दीपिका पदुकोण कॅमिओ रोलमध्ये सान्य मल्होत्रा, प्रियमणी, सुनिल ग्रोव्हर, योगी बाबू, रिद्धी डोग्रा आणि अस्था अग्रवाल यांच्यासोबत झळकणार आहे.

रेड चिलीज निर्माण करत असलेल्या 'जवान' चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी केले आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. 'पठाण' चित्रपटाला मिळालेल्या उत्तुंग यशानंतर शाहरुखच्या या चित्रपटाच्या परफॉर्मन्सकडे जागाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात तो 'डंकी' या चित्रपटात दिग्दर्शक राजकुमार हिराणीसोबत झळकणार आहे. आगामी काळात रिलीज होणारे 'जवान' आणि 'डंकी' हे दोन्ही चित्रपट शाहरुखसाठी खूप महत्त्वाचे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details