मुंबई - Painter om swami : चित्रकार-शिल्पकार ओम स्वामी एका 'आराध्या - दि डेइटी' या उपक्रमाद्वारे दृष्टीहिन मुलींना मूर्ती घडवण्यासोबतच चित्रकलेचेही धडे देणार आहेत. चित्रकला आणि शिल्पकलेद्वारे या मुलींसाठी भविष्यात रोजगार निर्माण होऊ शकेल. मुंबईतील ओम स्वामी यांचे आराध्या दि डेइटी ' हे अनोखे प्रदर्शन खूप प्रेरणादायक ठरलं. वरळीतील वाची आर्ट गॅलरीमधील कलेचा मोहून टाकणारा हा देखावा अनेकांसाठी प्रेरक ठरला. या कार्यक्रमाला अभिनेता विवेक ओबेरॉय, सचिन खेडेकर, राजीव शर्मा, अभिनेत्री रीना कपूर आवर्जून उपस्थित राहिले. वाची आर्ट गॅलरीचे मालक सुनीता संघाई, अजॉयकांत रुईया, विवेक ओबेरॉय आणि इतर कलाकारांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
विवेक ओबेरॉयने केलं उद्घाटन : या कार्यक्रमामध्ये विवेक ओबेरॉयनं म्हटलं आपण ओम स्वामींच्या रचनांचे चाहते असल्याचं सांगून टाकलं. ओम स्वामी यांनी घडवलेली पेंटिंग आणि शिल्प आपल्या घरात असल्याचा आवर्जून उल्लेख करत विवेकनं दृष्टी गमावलेल्या मुलींसाठी ओम स्वामी यांनी सुरु केलेल्या उपक्रमांचं तोंड भरुन कौतुक केलं. विवेक पुढे म्हणाला की, ''वाची हे सरस्वती आणि लक्ष्मीचे सुंदर मिश्रण आहे आणि या दोन देवी आपल्या संस्कृतीचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व आहेत. एकीकडे, लक्ष्मी समृद्धी, विपुलता आणि कल्याणाचं प्रतीक आहे, तर दुसरीकडे, माँ सरस्वती कलेचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा दोन्ही एकत्रपणे येतात, तेव्हा तुम्ही खरोखरच वाची आर्ट गॅलरीसारखे काहीतरी सुंदर बनवता.''