मुंबई - बॉलिवूड बहिष्काराचा मुद्दा गेल्या काही महिन्यापासून वादाचा विषय बनला. याचा फटका ब्रम्हास्त्र, लाल सिंग चढ्डा या चित्रपटासाह अक्षय कुमारच्या रक्षा बंधनलाही बसला. आता शाहरुख खानच्या पठाण चित्रपटालाही उजव्या विचारसरणीचे लोक विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले पहिल्यांदाच भाष्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना चित्रपटांवर भाष्य करणे थांबवण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप याने पंतप्रधान यांना खूप उशीर झाल्याचे म्हटले होते. अनुरागच्या या बोलण्याला आता चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर दिले आहे.
अनुराग कश्यप आणि विवेक अग्निहोत्री यांच्यात यापूर्वीही अनेकदा शाब्दिक चकमक झाली आहे. पहिल्यांदा अनुराग कश्यपने काय म्हटले होते ते पाहूयात. पंतप्रधानांना उद्देशन अनुरागने म्हटले होते, 'जर त्यांनी हे चार वर्षापूर्वी सांगितलं असतं, तर ती गोष्ट वेगळी होती. गोष्टी आता हाताबाहेर गेल्या आहेत. कोणी कोणाचे ऐकेल असे मला वाटत नाही.' पुढे अनुराग म्हणतो की, 'मॉब इज आऊट ऑफ कंट्रोल नाऊ.' अलया एफ अभिनीत डीजे मोहब्बत या त्याच्या आगामी चित्रपट अलमोस्ट प्यारच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी बोलताना अनुरागने वरील उद्गार काढले होते. अनुराग कश्यपची ही बातमी शेअर करताना, काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ट्विट केले, 'प्रेक्षक आता ‘मॉब’ आहेत? व्वा! व्वा! व्वा!'
अलीकडेच, पंतप्रधान मोदींनी, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी, चित्रपटांसारख्या अप्रासंगिक मुद्द्यांवर अनावश्यक टिपण्णी केल्याने पक्षाच्या विकासाचा अजेंडा मागे पडतो, अशी सूचना केली होती. याबाबत भारताच्या प्रमुख वृत्त संस्थांनी ही बातमी मोठ्या मथळ्यामध्ये चालवली होती.