महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Vivek Agnihotri lauds PeeCee : बॉलिवूडमधील गुंडाना झुगारुन प्रियंकाने 'स्वतःचे विश्व' निर्माण केल्याबद्दल विवेक अग्नीहोत्रीने केले कौतुक - प्रियांकाच्या मोठ्या खुलाशाची बातमी

कंगना राणौत नंतर, आता काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनीही प्रियांका चोप्रा जोनासच्या स्फोटक मुलाखतीबद्दल कौतुक तिचे केले आहे. या मुलाखतीत तिने बॉलिवूड का सोडले होते याचा खुलासा केला होता. विवेक अग्निहोत्रीने प्रियंकाला 'रिअल लाइफ स्टार' असे संबोधले आहे.

विवेक अग्नीहोत्रीने केले कौतुक
विवेक अग्नीहोत्रीने केले कौतुक

By

Published : Mar 28, 2023, 5:15 PM IST

मुंबई- ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनासची डॅक्स शेफर्डसोबत झालेली मुलाखत खूप गाजली. यात तिने अनेक मुद्द्यांना स्पर्श करताना बॉलिवूड सोडून पश्चिमेकडे वळण्याच्या तिच्या निर्णयाचाही खुलासा केला. खरंतर यामुळे ही मुलाखत सनसनाटी ठरली आहे. तिने जेव्हा बॉलिवूडला राम राम ठोकून हॉलिवूडचा रस्ता धरला तेव्हा ही तिची महत्त्वकांक्षी चाल समजली गेली होती. मात्र प्रियंका चोप्राने डॅक्स शेफर्डसोबतच्या पॉडकास्टमध्ये केलेल्या खुलाशामुळे ती हा कटू निर्णय का घेऊ शकली याची स्पष्टता मिळाली आहे. याबद्दल पूर्वी कोणालाच याबद्दल फारसे माहित नव्हते.

पश्चिमेकडे जाण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल बोलताना प्रियंका चोप्रा म्हणाली की ती वेळ आली आहे जेव्हा तिला बॉलिवूडमध्ये साईडलाईन केलं जातंय असे वाटत होते. लोकांच्यात असलेल्या कुजबुजीमुळे संधीची कमरतादेखील हा निर्णय घेण्यात मुख्य भूमिका बजावली. हॉलिवूडमध्ये जाण्याच्या तिच्या निर्णयावर चिंतन करताना, प्रियंका पुढे म्हणाली की तिला उद्योगातील राजकारणापासून ब्रेक हवा होता कारण तिची कोणतीही भूक शिल्लक नव्हती.

विवेक रंजन अग्निहोत्री यांचे ट्विट

प्रियंका चोप्राच्या या लेटेस्ट मुलाखतीमुळे बॉलीवूडमध्येही वादळ निर्माण झाले आहे आणि बाहेरही ते जाणवत आहेत. कंगना रणौतने याला पुष्टी देत आणि करण जोहरनेच प्रियंकाच्या विरोधात गँगअप केल्याचा दावा केल्यानंतर, आता विवेक अग्निहोत्रीने देसी गर्लच्या स्फोटक मुलाखतीवर आपले मत व्यक्त केले आहे.

ट्विटरवर विवेकने प्रियांकाच्या मोठ्या खुलाशाची बातमी शेअर केली आणि बॉलीवूडमधील पॉवर प्लेला शरण न गेलेली 'रिअल लाइफ स्टार' म्हणून अभिनेत्री प्रिंयका चोप्राचे कौतुक केले. 'जेव्हा मोठमोठे गुंड दादागिरी करतात, काही गुडघे टेकतात, काही शरणागती पत्करतात, काही हार मानतात आणि सोडतात, काही ड्रग्ज घेतात, काहींनी जीवही गमावला आहे. या 'अशक्य' गुंडांच्या टोळीच्या विरोधात, फारच कमी लोक सोडून देतात आणि स्वतःचे विश्व बनवतात. तेच खऱ्या आयुष्यातील यशस्वी तारे आहेत,' असे ट्विट विवेकने केले.

यापूर्वी कंगनाने करण जोहरला सुपरस्टार शाहरुख खानसोबतच्या मैत्रीबद्दल प्रियंका चोप्रावर बंदी घातल्याबद्दल निंदा केली होती. फॅशनमध्ये प्रियंकासोबत काम केलेल्या क्वीन अभिनेत्री कंगना रणौतने सांगितले की करण जोहरने माजी मिस वर्ल्ड प्रियंका चोप्राचा छळ केला म्हणूनच तिने सोडला आहे.

हेही वाचा -Emily Ratajkowski Will Leave You Awestruck : एमिली राताजकोव्स्कीच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांना केले वेडे

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details