मुंबई - The Vaccine War : विवेक रंजन अग्निहोत्री सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटाचं देशभरातून कौतुक होत आहे, तर दुसरीकडे हा चित्रपट जागतिक स्तरावरही जबरदस्त कामगिरी करत आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाला आता ऑस्करच्या लायब्ररीत स्थान मिळालं आहे. माउथ पब्लिसिटीमुळे हा चित्रपट खूप चर्चेत आला होता. अलीकडे, अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या लायब्ररीनं 'द व्हॅक्सिन वॉर'च्या पटकथेची प्रत त्याच्या प्रतिष्ठित कोर संग्रहाचा भाग होण्यासाठी मागितली आहे.
'द व्हॅक्सिन वॉर'ला ऑस्कर लायब्ररीत प्रवेश : 'द व्हॅक्सिन वॉर' पटकथेची प्रत लायब्ररी संग्रहातच नाही तर अकादमीचे संशोधन लायब्ररीमध्ये विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी आणि चित्रपटात रस असलेल्या सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' मध्ये नाना पाटेकर, सप्तमी गौडा, रायमा सेन, अनुपम खेर आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट भारताने ज्या बिकट परिस्थितीत लस तयार केल्या, त्या परिस्थितीची भयावहेची कहाणी सांगतो. पल्लवी जोशी आणि आय ऍम बुद्धा निर्मित, हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई केली नाही. याआधी आमिर खानचा 'लगान', कपिल शर्माचा 'ज्विगातो' यासारख्या चित्रपटानं या लायब्ररीत स्थान मिळाले आहे.