मुंबई - टीम इंडियाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्यात मदत केल्यानंतर, क्रिकेटपटू विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या कसोटी सामन्यात १८६ धावा केल्या. दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर त्याची बॅट तळपली आणि शतक बनवण्याचा दुष्काळही संपला. आता तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळण्यापूर्वी मुंबईत मजेत वेळ घालवत आहे. नुकतेच त्याने त्याच्या ट्विटरवर एक फोटो टाकला. यामध्ये तो नॉर्वेजियन डान्स ग्रुप क्विक स्टाईलला भेटल्याचे दिसत आहे.
विराट कोहलीने आपल्या ट्विटरवर नॉर्वेजियन डान्स ग्रुप क्विक स्टाईलसोबतचा एक व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलंय, 'मुंबईमध्ये मी कोणाला भेटलो याचा अंदाज लावा.' पुढे फायर इमोजी टाकत त्याने @TheQuickstyle, असे लिहिले आहे.
क्विक स्टाईलने त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर देखील कोहलीसोबतचा एक उत्कृष्ट व्हिडिओ टाकला शेअर केला आहे. क्लिपमध्ये कोहली या ग्रुपसोबत वेगळ्या पद्धतीने डान्स करताना दिसत आहे.
डान्स ग्रुपमधील एक सदस्य क्रिकेटची बॅट उचलताना व्हिडिओ सुरू होतो. या बॅटचे काय करावे याबद्दल तो अनभिज्ञ आहे आणि काही तरी या वस्तुसोबत करण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसे कोहली त्याच्याकडे जातो आणि त्याला बॅट देण्याचे हातवारे करतो. लवकरच, इतर क्रू सदस्य सामील होतात आणि ते स्टिरिओ नेशनच्या इश्कवर डान्स करतात.हा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल झाला असून, नेटिझन्सच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही या क्लिपवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने कमेंट विभागात फायर इमोजी टाकल्या आहेत. अभिनेता अपारशक्ती खुराना यांनी कमेंट केली, 'वाह!!' माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने कमेंटमध्ये छान असं लिहिलंय. भारतीय गाण्यांचे वेड असलेला क्विक स्टाईल हा नॉर्वेतील ग्रुप जगभर लोकप्रिय आहे. सध्या हा ग्रुप भारताच्या भेटीसाठी आला आहे. 'तनु वेड्स मनू' चित्रपटातील 'सादी गल्ली' आणि 'बार बार देखो' मधील 'काला चष्मा' यांसारख्या लोकप्रिय बॉलीवूड गाण्यांच्या हुक स्टेप्स रिक्रिएट केल्यानंतर हा ग्रुप प्रसिद्ध झाला.
हेही वाचा -Lokesh Kanagaraj's Birthday : संजय दत्तने लिओ दिग्दर्शक लोकेश कनागराजच्या वाढदिवसानिमित्त लिहिली दिलखुलास चिठ्ठी