महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sushmita Sen : सुष्मिता सेनने आपल्या मुलीसोबत आयफेल टॉवरसमोर केला डान्स... - डान्स चाहत्यांना खूप आवडला

सुष्मिता सेनने मुलगी अलिशासोबत पॅरिसमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत ती आणि तिची मुलगी आयफेल टॉवरसमोर सुंदर डान्स करत आहे. त्यांचा हा डान्स चाहत्यांना खूप आवडला आहे.

Sushmita Sen
सुष्मिता सेन

By

Published : Jul 6, 2023, 5:42 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन मुलगी अलिशाला घेऊन पॅरिसला गेली आहे. अलिशा पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. दरम्यान त्यापूर्वी, सुष्मिताने आपल्या मुलीला खुश करण्यासाठी पॅरिसमधील आयफेल टॉवर दाखवला. अलिशा पहिल्यांदाच पॅरिसला गेली आहे. यावेळी सुष्मिताने तिच्या मुलीचा दिवस चांगला जाण्यासाठी तिच्यासोबत फार मजा आणि डान्स केला. या सर्व करून अलिशा फार खूश आहे आणि तिच्या पहिल्या पॅरिस ट्रिपचा मनमोकळेपणाने आनंद घेत आहे. सुष्मिताने अलिशासोबतचे पॅरिसमधील आयफेल टॉवरवरील सुंदर दृश्याचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.

मुलीसोबत सुष्मिता गेली पॅरिसला : सुष्मिताने शेअर केलेल्या व्हिडिओत ती आपल्या मुलीसोबत आयफेल टॉवरसमोर डान्स करताना दिसत आहे. सुष्मिता ही नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. यावेळी सुष्मिताने काळ्या मिनी ड्रेसवर पांढऱ्या रंगाचे ब्लेझर घातले आहे आणि अलिशाही पांढऱ्या पोशाख परिधान केला आहे. या व्हिडिओमध्ये ती देखील सुंदर दिसत आहे. आपल्या मुलीसोबतच्या या सुंदर डान्सचा व्हिडिओ शेअर करत सुष्मिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्या शोनाची पॅरिसची पहिली ट्रीप, त्यानंतर ती तिच्या पुढील अभ्यासासाठी परदेशात जाईल, वेळ कसा लवकर निघून जातो, .मी आमच्या नृत्याची कायम कदर करीन असे तिने लिहले आहे.

चाहत्यांनी केल्या कमेंटचा वर्षाव :दरम्यान, सुष्मिता सेनचा हा सुंदर व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांची मन उत्साहाने भरली आहेत. या व्हिडिओवर अनेक छान कमेंट आल्या आहेत. एका चाहत्याने या व्हिडिओवर लिहिले की, आई आणि मुलगी यांच्यातील प्रेम सर्वात अनोखे आहे. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, अलीशा काही वेळातच मोठी झाली आहे आणि आता ती आपल्याला सोडून परदेशात जात आहे. आणखी एका चाहत्याने लिहिले, 'चिंगारी' चित्रपटादरम्यान अलिशा तुझ्या मांडीवर होती आणि आता ती रॉकस्टारसारखी दिसत आहे, वेळ खरोखरच वेगाने निघून जातो. त्याचबरोबर तिच्या भावाची एक्स पत्नी चारू असोपा हिनेही सुष्मिताच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. चारूने या व्हिडिओवर हार्ट इमोजी टाकले आहे.

सुष्मिता सेनचे वर्कफ्रंट : सुष्मिता सेन ही आगामी वेब सीरीज आर्या ३मध्ये दिसणार आहे. तसेच ती ताली या चित्रपटात झळकणार आहे, ज्यामध्ये ती ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या श्री गौरी सावंतची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा :

  1. SRKs Jawan trailer : शाहरुखच्या जवान ट्रेलरवर रोखल्या सर्व नजरा, तुम्हीही आहात का सज्ज?
  2. Shanaya Kapoor : शनाया कपूर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून करणार फिल्मी करिअरची सुरुवात
  3. CoCo Lee passes away : निराशेच्या गर्तेत गायिका कोको लीने केली आत्महत्या, संगीत जगतात शोककळा

ABOUT THE AUTHOR

...view details