महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sur Lagoo De : विक्रम गोखले यांचा शेवटचा मराठी चित्रपट; 'सूर लागू दे' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित! - ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले

काही दिवसांपूर्वीच विक्रम गोखले यांचे देहवसन झाले. सब्बिर खान दिग्दर्शित हिंदी चित्रपटात त्यांची शेवटची भूमिका बघायला मिळेल. तसेच त्यांची भूमिका असलेला शेवटचा मराठी चित्रपट असेल 'सूर लागू दे'. काही कलाकार आपल्या उपस्थितीने वातावरणात नवचैतन्य निर्माण करतात, पण काही अनुपस्थितीतही आपली उणीव भासू देत नाहीत. ते गेले तरी त्यांचे काम कायम बोलत राहील. त्यातीलच एक म्हणजे विक्रम गोखले. (Vikram Gokhales last Marathi movie Sur Lagoo De)

Vikram Gokhale
विक्रम गोखले

By

Published : Nov 29, 2022, 4:35 PM IST

मुंबई:विक्रम गोखले यांनी नेहमी संवेदनशील, सामाजिक आशयावर आधारलेले, वर्तमान काळाशी निगडित असलेलल्या आणि नाविन्यपूर्ण विषयावर आधारलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'सूर लागू दे' हा चित्रपट त्यांची परंपरा पुढे सुरू ठेवणारा असून त्यांच्या पश्चातही त्यांचं काम आणखी प्राभावीपणे सादर करणारा ठरेल. या चित्रपटाची कथा अशा लोकांवर आधारलेली आहे ज्यांच्यासाठी विक्रम गोखले कायम उभे राहिले. (Vikram Gokhales last Marathi movie Sur Lagoo De)

सूर लागू दे

राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गोखले: नुकतीच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मनाला चटका लावणारी एक्झीट घेतली. याच शोकाकूल वातावरणात सिनेरसिकांना दिलासा देणारी बातमी म्हणजे त्यांनी अभिनय केलेला 'सूर लागू दे' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच सोशल मीडियावर 'सूर लागू दे' या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये हे दोन दिग्गज कलाकार 'सूर लागू दे'मध्ये मुख्य भूमिकेत आहेत.


शीर्षकातच संगीताचा ताल: निर्माते अभिषेक 'किंग' कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी ऑडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रवीण विजया एकनाथ बिरजे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी या चित्रपटाच्या वितरणाचे काम पाहत आहेत. 'सूर लागू दे' या चित्रपटाच्या शीर्षकातच संगीताचा ताल दडलेला आहे. त्यानुसार या चित्रपटाचे कथानकही काहीशा वेगळ्या पठडीतील आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेत्री रीना अगरवालही महत्त्वपूर्ण भूमिकेत असून इतरही मातब्बर कलावंत यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.


अनमोल मेसेज: याबाबत दिग्दर्शक प्रवीण म्हणाले की, 'सूर लागू दे' या चित्रपटाची कथा कुठेही घडू शकणारी आहे. आयुष्याच्या संध्याकाळी एक व्यक्ती कशाप्रकारे संघर्ष करत इतरांसाठी प्रेरणादायी कार्य करतो ते यात पहायला मिळेल. यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या विक्रम गोखले यांच्या पश्चात 'सूर लागू दे' हा चित्रपट प्रदर्शित करताना संपूर्ण टिमला खूप दु:ख होत आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे, पण 'सूर लागू दे' या चित्रपटाच्या रूपात जाता-जाता त्यांनी आपल्या चाहत्यांना एक अनमोल मेसेज दिला आहे. त्यामुळे त्यांना समर्पित भावनेने आम्ही हा चित्रपट रसिकांसमोर आणत आहोत. रसिक त्याला उत्तम दाद देऊन आपल्या लाडक्या कलाकाराला अभिवादन करतील यात शंका नाही. 'सूर लागू दे' या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केले असून, संगीत पंकज पडघन यांनी दिले आहे.


मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा जपत: सामाजिक जाणीवेचे भान राखून लिहिलेले प्रेरणादायी कथानक या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा जपत 'सूर लागू दे' फुल टू मनोरंजन करणार आहे. यात नात्यांची गोष्टही आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details