मुंबई - आयपीएलचे संस्थापक ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या नात्याबाबत चर्चेचा बाजार सध्या चांगलाच तापला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीला गोल्ड डिगर म्हटले जात आहे, ज्याला अभिनेत्रीने चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता सुष्मिता सेनचा माजी प्रियकर आणि चित्रपट निर्माता विक्रम भट्ट तिच्या समर्थनार्थ आला आहे. सुष्मिता सेन ही गोल्ड डिगर नाही हे सिद्ध करण्याचा विक्रमने पुरेपूर प्रयत्न केला आहे. एका मुलाखतीत विक्रम भट्ट यांना ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिली.
एक्स गर्लफ्रेंड सुष्मिता सेनला गोल्ड डिगरला म्हणत असल्याबद्दल विक्रम भट्ट म्हणाले, 'सुष्मिता एक लव्ह डिगर आहे, गोल्ड डिगर नाही. मला वाटते की इतरांच्या आयुष्याची चेष्टा करणे हे मनोरंजन बनले आहे, एखाद्याची शोकांतिका म्हणजे एखाद्यासाठी मनोरंजन बनले आहे'.
विक्रम पुढे म्हणाला, ''येथे नेहमीच असे घडते, जेव्हा करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केले तेव्हा तिला ट्रोल देखील केले गेले होते. त्यामुळे मला वाटते की हे सर्व क्षेत्रानुसार आहे आणि जर तुम्ही सेलिब्रिटी असाल आणि जर तुमचा असा एकादा निर्णय इंटरनेट युजर्सना चेष्टास्पद वाटू लागला तर ते ट्रोलिंग करायला सुरूवात करतात.''
विक्रमने सांगितली एक गोष्ट - मीडिया रिपोर्टनुसार विक्रमने सांगितले आहे की सुष्मिता ही एक वेगळ्या प्रकारची मुलगी आहे, ती कोणाशीही संबंध ठेवण्यासाठी तिचा बँक बॅलन्स तपासत नाही. विक्रमने त्याच्या अनुभवांच्या आधारे या गोष्टी सांगितल्या आहेत.