मुंबई- दक्षिण अभिनेता विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चन स्टारर बहुप्रतिक्षित चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन-1' 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. ऐश्वर्या राय आणि विक्रम यांच्याशिवाय या चित्रपटात दक्षिणेतील कलाकार जयम रवी, कार्ती आणि शोभिता धुलिपाला यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचा रनिंग टाइम 2.45 तासांचा आहे. निर्माते मणिरत्नम दिग्दर्शित दिग्गज चित्रपट या चित्रपटाने देशभर एक वेगळी उक्ंठा निर्माण केली आहे.
दोन भागात 'पोनियान सेल्वन-1' बनवण्याची योजना आहे. हा चित्रपट कल्कीच्या क्लासिक तामिळ कादंबरीवर आधारित आहे. कल्कीने ही कादंबरी 1995 मध्ये लिहिली होती. लायका प्रॉडक्शन आणि मद्रास टॉकीज यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपटातील सर्व प्रमुख पात्रांचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी एकच खळबळ उडाली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आला आहे.
चित्रपटाची कथा?- 'पोनियन सेल्वन-1' ची कथा 10 व्या शतकातील चोल साम्राज्यातून घेण्यात आली आहे. चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या पात्राचे नाव नंदिनी आहे.