अबू धाबी- सोनाक्षी सिन्हा स्टारर वेब सीरिज दहाड मध्ये उत्कृष्ट अभिनय केल्यामुळे चर्चेत असलेला अभिनेता विजय वर्माने अबू धाबीमध्ये आयफा अवॉर्ड्स 2023 मध्ये काय परिधान करणार आहे याचा खुलासा केला. एएनआयशी बोलताना तो म्हणाला की, 'मला माझी साऊथ इंडियन केरळ स्टाईलची लुंगी नेसायला खूप आवडते आणि मला वाटते की अबू धाबीमध्ये अशा हवामानासाठी हा एक उत्तम पोशाख आहे'.
दहाडच्या कौतुकाबद्दल विजयने मानले आभार - दहाडमधील त्याच्या कामाचे सर्व कौतुक होत असल्याबद्दल विजयने सर्वांचे आभार मानले. अबू धाबी येथे होत असलेल्या आयफा अवॉर्ड्स 2023 मध्ये फॅशनबद्दलच्या त्याच्या प्रेमाबद्दलही तो बोलला. 'मी अतिशय योग्य जागी आहे असे वाटते. माझं काम मी मनःपूर्वक करतोय. मी व आमची टीम प्रयत्न करत असलेल्या कामावर लोक खूश आहे, ते प्रम करताहेत, याचा मला आनंद होतो आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो. सुरू असलेली ही कामगिर, यश कसे टिकवून ठेवायचे हे मला माहिती नाही , पण मी अखेर पर्यंत असेच कष्ट आणि प्रयत्न करत राहणार आहे', असे तो म्हणाला.
आयफा पुरस्कार २०२३ मध्ये विजय वर्मा - आयफाच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अभिनेता विजय वर्माचा एक फोटो शेअर करण्यात आलाय. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, विजय वर्मा SOBHA रियल्टी IIFA 2023 ग्रीन कार्पेटवर चालत असताना तो अतिशय सुंदर दिसत आहे. आयफा अवॉर्डसाठीच्या भव्य रात्रीसाठी विजय वर्माने संपूर्ण काळ्या रंगाचा पोशाख निवडला आहे. त्याने मॅचिंग शर्टसह ब्लॅक सूट घातला होता आणि मॅचिंग शूजसह त्याचा लुक ऍक्सेसराइज केला होता.
विजयने ग्रीन कार्पेटवर त्याच्या डॅपर लुकमध्ये एक आकर्षक एंट्री केल्यानंतर उपस्थित पापाराझी चक्रावले होते. फोटो घेताना त्यांची दमछाक झाली. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, चित्रपट, दिग्दर्शक आणि इतर सर्जनशील व्यक्तींचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ग्लिटरी अवॉर्ड शो आयोजित केला जातो. फराह खान आणि राज कुमार राव यावर्षी IIFA रॉक्स 2023 चे होस्ट आहेत. तर दुसरीकडे, अभिषेक बच्चन आणि विकी कौशल शनिवारी अवॉर्ड नाईट होस्ट करतील.
हेही वाचा -IIFA 2023 : सलमान खानच्या अंगरक्षकाने धक्काबुक्की केल्यानंतर विकी कौशलची पहिली प्रतिक्रिया