मुंबई - अत्यंत प्रतिभावान अभिनेता विजय वर्मा यांनी आपल्या अष्टपैलू अभिनय सामर्थ्याने बॉलिवडमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अत्यंत सूक्ष्म विचार करुनच तो चित्रपटांची निवड करतो. त्यामुळे तो एक प्रकारे भूमिका जगत असतो. अभिनयासाठी नेहमी चर्चेत राहणारा विजय वर्मा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. तो त्याच्या लस्ट स्टोरीज 2मधील सह-कलाकार तमन्ना भाटियाला डेट करत असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, विजयला डेटिंगच्या अफवांबद्दल विचारण्यात आले आणि तमन्नाचे नाव घेताना त्याची बदलेली भावमुद्रा उपस्थित दुर्लक्षित करु शकले नाहीत. सध्या दहाडचे प्रमोशन करत असलेल्या या प्रतिभाशाली विजय वर्माचा सहकलाकार गुलशन देवय्याने दहाड टीझर कार्यक्रमादरम्यान तमना भाटियासोबत चिडवल्याबद्दल त्याला विचारले असता तो आपले लाजणे लपवू शकला नाही.
दहाडच्या प्रमोशनमध्ये विजय वर्माचे लाजणे - त्याचे घडले असे की, दहाडच्या प्रमोशन दरम्यान सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, सोहम शाह आणि गुलशन देवय्या स्टोजवर हजर होते. स्टेजवर हजर असलेल्या इतरांनी हिरव्या रंगाचे ड्रेस घातले होते, पण विजय वर्माने लाल रंगाचा प्रिटेड ड्रेस घातला होता. त्याला पाहून सोनाक्षी म्हणाली की, 'सर्वजण हिरवे ड्रेस घालून आलेत पण हा एकटाच लाल घालून आलाय'. यावर तो हसला, त्यावरुनही लोक हसले. त्यावर बाजूला उभा असलेला देवय्या म्हणाला की, 'हमारी बडी तमन्ना थी की स्माईल देखने को मिलेगा', यावर विजयच्या चेहऱ्यावरचे लाजणे दिसत होते. तो बराचवेळ काय बोलायचे यावर विचार करत राहिला आणि लाजतही राहिला. यानंतर त्याला सोनाक्षीने स्माईल म्हणण्याची विनंती केली तेव्हा गुलशन पुन्हा म्हणाला, 'अब इनकी तमन्ना पुरी करो'. यावरही तो पुन्हा लाजला आणि हसत राहिला.