मुंबई : अभिनेत्री तमन्ना भाटियाने अलीकडेच अभिनेता विजय वर्मासोबतच्या तिच्या नातेसंबंधाची पुष्टी केली आहे आणि दोघे लवकरच नेटफ्लिक्स अँथॉलॉजी चित्रपट लस्ट स्टोरीज 2 मध्ये दिसणार आहेत. तमन्ना आणि विजय यांच्या आगामी चित्रपटाचा प्रोमो हा सध्याला खूप जास्त चर्चेत आला आहे. या प्रोमोमध्ये दोघांनी प्रेमावर कशी चर्चा केली आहे हे दाखविण्यात आहे. प्रत्येक प्रेमकथा ही वासना कथा असे या चित्रपटाच्या प्रोमोवरून झळकत आहे.
चित्रपटाचा प्रोमो :प्रोमो व्हिडिओमध्ये, विजय तमन्नाला विचारतो की 'प्रत्येक प्रेमकथा ही एक वासनाकथाही असते का? ज्यावर तिने उत्तर दिले की बॉलीवूड चित्रपटांमधील बहुतेक प्रेम दृश्ये लस्ट असतात. विजय नंतर कुछ होता है, आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे यांसारख्या बॉलीवूड चित्रपटांमधील काही दृश्यांची उदाहरणे देतो. त्यावर देखील तमन्ना म्हणते हे सर्व लस्ट आहे. तो म्हणतो, 'पोटात फुलपाखरे होतात तेव्हा काय?' हे देखील सर्व लस्ट आहे. अशी ती म्हणते. विजय हा सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या रात लांबियांच्या सुप्रसिद्ध प्रेम गाण्याचे बोल गाण्यास सुरुवात करतो जे तमन्नाच्या मते प्रेम नसून लस्ट आहे. अशी ती सांगते. त्यानंतर विजय नंतर तमन्नाला त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारतो परंतु प्रोमो त्या मनोरंजक नोटवर संपतो.