महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

विजय सेतुपती वाढदिवसानिमित्त 'हे' 5 चित्रपट जरूर पाहा - टॉप पाच चित्रपट

Vijay Sethupathi Birthday : साऊथ अभिनेता विजय सेतुपतीचा आज 16 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. या विशेष दिवशी आपण त्याच्या टॉप पाच चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. विजयला 'मक्कल सेल्वान' या टोपणनावानेही ओळखले जाते.

Vijay Sethupathi Birthday
विजय सेतुपती वाढदिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2024, 5:37 PM IST

मुंबई - Vijay Sethupathi Birthday : साऊथ अभिनेता विजय सेतुपतीचा अभिनय हा सर्वांना आवडतो. शाहरुख खानने देखील विजयच्या अभिनयाने खूप प्रभावित झालं असल्याचं म्हटलं होतं. 'किंग खान'च्या 'जवान' चित्रपटात विजय खलनायकच्या भूमिकेत दिसला होता. 'जवान' हा 2023 मधील हिंदी चित्रपटसृष्टीतला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1150 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. विजय आज त्याचा 16 जानेवारी रोजी 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. विजयचा चेहरा फोटोजेनिक आहे, त्यामुळे त्याला चित्रपटांमध्ये काम मिळाले. आता या विशेष प्रसंगी आपण विजयच्या 5 चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.

विक्रम वेध :अभिनेता आर. माधवन आणि अभिनेता विजय स्टारर 'विक्रम वेधा' हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर गायत्री यांनी केलं आहे. 'विक्रम वेधा' चित्रपटात विजय खलनायकच्या भूमिकेत होता. या चित्रपटात क्राईम इन्व्हेस्टिगेशन सस्पेन्स असल्यामुळे हा चित्रपट अनेकांना आवडला होता. 'विक्रम वेधा' चित्रपटाचा हिंदी रिमेक बॉलीवूडमध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खानला घेऊन बनवला गेला.

सुपर डिलक्स : 2019 साली प्रदर्शित झालेला 'सुपर डिलक्स'मध्ये विजय सेतुपती हा ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटामध्ये त्याचा लूक हा अप्रतिम होता.'सुपर डिलक्स' चित्रपटाची कहाणी खूप दमदार आहे. या चित्रपटासाठी विजयला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'सुपर डिलक्स'मध्ये सामंथा रुथ प्रभु , फहद फाजिल, गायत्री, रम्या कृष्णन हे कलाकार दिसले आहेत.

मास्टर :थलपथी विजय स्टारर अ‍ॅक्शन चित्रपट 'मास्टर'मध्ये विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. हा चित्रपट लोकेश कनगराज यांनी दिग्दर्शित केला आहे. विजय सेतुपतीनं या चित्रपटात भवानी नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली आहे. थलपथी विजय आणि विजय सेतुपती यांची नायक-खलनायक जोडी चांगलीच गाजली होती. खलनायक म्हणून विजयच्या फिल्मी करिअरच्या हिटलिस्टमध्ये 'मास्टर'चा समावेश आहे.

जवान : शाहरुख खान आणि नयनतारा अभिनीत 'जवान' हा चित्रपट सुपरहिट झाला. या चित्रपटात विजयनं काली गायकवाड नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली होती. 2023 मधील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट असून विजयनं 'जवान'द्वारे बॉलिवूडमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. हा चित्रपट 2023मध्ये प्रदर्शित झाला होता.

मेरी ख्रिसमस :विजय सेतुपती स्टारर 'मेरी ख्रिसमस' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. 'मेरी ख्रिसमस' चित्रपटात विजयसोबत कतरिना कैफ दिसली आहे. हा चित्रपट 12 जानेवारीला प्रदर्शित झाला.

हेही वाचा :

  1. कियारा अडवाणीनं सिद्धार्थ मल्होत्राला वाढदिवसानिमित्त अनोख्या पद्धतीनं दिल्या शुभेच्छा
  2. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने बीचवर मुलगी मालती मेरीचा वाढदिवस केला साजरा
  3. 75 व्या एमी पुरस्कार सोहळ्यात दिवंगत मॅथ्यू पेरीचा 'फ्रेंड्स थीम सॉन्ग'ने सन्मान

ABOUT THE AUTHOR

...view details